आई-वडिलांच्या डोक्यात गंभीर वार करून हत्या
या घटनेतील आरोपीचे नाव सुनील नारायण भोसले (वय ४५) असून, त्याने स्वतःच्या राहत्या घरी ७५ वर्षीय वडील नारायण गणपतराव भोसले आणि ६५ वर्षीय आई विजयमाला नारायण भोसले यांची हत्या केली. आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलण्यासाठी घरातील विळी, काच आणि लाकडी दांडक्याचा वापर केला. या वस्तूंच्या साहाय्याने त्याने आई-वडिलांच्या डोक्यात गंभीर वार करून त्यांचा निर्घृण खून केला.
advertisement
आई कुठे आहे रे...
संशयीत आरोपीने आधी आईच्या हाताच्या नसा कापल्या, तसेच चेहऱ्यावर देखील चाकूने सपासप वार केले. यावेळी पुढच्या खोलीत असलेल्या वडिलांना हा प्रकार लक्षात आला नाही. आई कुठे आहे रे... म्हणून विचारणा केली असता मागं आहे जावा.. म्हणून सांगत वडिलांना पाठीमागून डोक्यात काठीने हल्ला केला. तसेच वडिलांच्या हाताच्या शिरा कापून टाकल्या. त्यात वडिलांचा देखील जीव गेला.
पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला अन्...
धक्कादायक बाब म्हणजे, हे अघोरी कृत्य केल्यानंतर आरोपी सुनील स्वतःहून हुपरी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पहाटेच्या शांततेत घडलेल्या या प्रकारामुळे आजूबाजूचे नागरिक सुन्न झाले आहेत. घरगुती वाद किंवा अन्य कोणत्या कारणातून ही हत्या झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
