शाळेला सुट्टी असल्याने आईला विचारून एक चिमुकला आपल्या मित्रांसोबत उत्साहात खेळत होता, पण क्रिकेट खेळण्याच्या नादात शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागला. मयत मुलाचे नाव अफान असिफ बागवान असं आहे. त्याच वय फक्त 13 वर्ष होतं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
खेळ सुरू असताना त्यांचा बॉल शेजारील हनुमंत खांडेकर यांच्या इमारतीच्या टेरेसवर गेला. तो बॉल आणण्यासाठी अफान टेरेसवर गेला. याच इमारतीवरून विमानतळाला वीज पुरवठा करणारी 11000 व्होल्ट क्षमतेची उच्चदाब वाहिनी (High-tension power line) जात होती. या चिमुकल्याचं त्याकडे लक्षही गेलं नाही.
advertisement
टेरेसच्या अगदी दीड-दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या या विद्युत वाहिनीचा त्याला संपर्क होताच, त्याला जोराचा विद्युत धक्का बसला. विद्युत धक्का इतका जबर होता की, दुर्दैवाने या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, काल कोल्हापुरात भयंकर अपघाताची घटना समोर आलीय. कोल्हापूर-गारगोटी मार्गावर चुये फाट्याजवळ व्हॅन आणि दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत आज दोघे ठार झाले. दुचाकीस्वार शिवाजी शंकर कोळी (वय ४५ रा. कागल) आणि व्हॅनचालक अतुल अरविंद पाटील (३० रा. गुडाळ, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत. व्हॅनमधील गजानन प्रभाकर चौगले (रा. तारळे), अनिल शिवाजी जाधव (रा. धामोड) तसेच दुचाकीवरील वैशाली शिवाजी कोळी व त्यांची नात सुप्रिया चेतन दळवी (३) जखमी झाले. इस्पुर्ली पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली.
