फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेत रूपांतर
लहान मुलांचे अपहरण व निघृण हत्याकांडाच्या संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणात या दोन्ही बहिणींना फाशीची शिक्षा झाली होती. मात्र, सरकारच्या दिरंगाईमुळे त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. फाशीची होऊनही त्यांच्या दयेच्या अजर्जाबाबत निर्णय होण्यात राज्य सरकारकडून अक्षम्य दिरंगाई झाल्याच्या कारणाखाली उच्च न्यायालयाने 18 जानेवारी 2022 रोजी ही शिक्षा रद्द करून तिचे रूपांतर जन्मठेपेत केलं. मात्र, यावेळी 25 वर्षांचा तुरुंगवास झाला असल्याच्या कारणास्तव सुटका करण्याची दोन्ही बहिणींची विनंती फेटाळली होती. नंतर याविषयी त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळाला नाही.
advertisement
अंतरिम दिलासा देण्यास नकार
दरम्यान, सीमाने फर्लोवर (चांगल्या वर्तणुकीबद्दल काही दिवसांची सुटका) सुट्टी मिळण्यासाठी गेल्या वर्षी अर्ज केला, तर रेणुकाने यावर्षी तसा अर्ज केला. तुरुंग प्रशासनाने ते अर्ज मान्य केले नसल्याने दोघींनी उच्च न्यायालयात रिट याचिका केल्या आहेत. प्राथमिक सुनावणीनंतर न्या अजय गडकरी आणि न्या रणजीतसिंह भोसले यांच्या खंडपीठाने याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतल्या, मात्र अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे.
नेमकं प्रकरण काय होतं?
दरम्यान, 1996 साली कोल्हापुरात 40 पेक्षा जास्त लहान मुलांचं अपहरण करुन त्यापैकी 5 लहान मुलांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास केला असता कोल्हापूरच्या रेणुका शिंदे आणि सीमा गावित या बहिणींना या गुन्ह्यांत अटक करण्यात आली. तपासात ज्या धक्कादायक गोष्टी समोर आल्या त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले होते. या बहीणींनी त्यांच्या आईसोबत मिळून क्रूरपणे 5 मुलांची हत्या केल्याचे तपासात समोर आले. या दोघींची आई अंजना हिला देखील या प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र, जेलमध्येच तिचा मृत्यू झाला. दरम्यान सुरु असलेल्या खटल्यात दोघी बहिणी दोषी आढळल्या यामुळे कोल्हापूर न्यायालयाने 2001 मध्ये गावित बहिणींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर या बहिणींनी कोल्हापूर न्यायालयाच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आवाहन दिले होते.