TRENDING:

'मोठं मोठं बोलून होत नसते क्रांती..' अस्सल कोल्हापुरी गली बॉय, एकदम नादखुळा VIDEO

Last Updated:

पाश्चात्य हिप-हॉप आणि रॅप संस्कृतीला कोल्हापुरी स्टाईलने मिळालेली ही छटा आजकाल तरुण वर्गाला आकर्षित करत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निरंजन कामत - प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : कोल्हापुरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा रंकाळा. नुकत्याच केलेल्या नूतनीकरणानंतर रंकाळ्याला एक वेगळे वैभव प्राप्त झाले. याच विद्युत रोषणाईच्या झगमगटात रंकाळ्याच्या काठावर कोल्हापुरी गली बॉय अवतरले. त्यांनी विशेष 'लोकल 18' ला आपल्या रॅपच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. पाश्चात्य हिप-हॉप आणि रॅप संस्कृतीला कोल्हापुरी स्टाईलने मिळालेली ही छटा आजकाल तरुण वर्गाला आकर्षित करत आहे.

advertisement

यावेळी युवा रॅप कलाकारांनी 'लोकल 18' शी बोलताना, रॅप संगीत केवळ एक पाश्चात्य संस्कृतीचा भाग नाही, तर ती एक सांस्कृतिक क्रांती आहे, जी कोल्हापूरच्या परंपरेला नवीन रूप देत आहे. यावेळी 'लोकल 18' ने त्यांच्याविषयी, त्यांच्या जीवनशैली विषयी माहिती घेतली. यावेळी त्यांनी खास 'लोकल 18' साठी रॅप संगीताच्या वेगवेगळ्या शैल्या सादर केल्या.

advertisement

यावेळी कोल्हापूरच्या रॅप कलाकारांनी रॅप संगीताच्या माध्यमातून आपल्या शहरातील जीवनशैली, राजकारण, सामान्य माणसाची जडणघडण आणि सामाजिक संघर्ष मांडले आहेत. अलीकडे रॅप संस्कृती उदयाला आल्यानंतर हे कलाकार आपापल्या सोशल मीडियावर किंवा त्यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या इव्हेंट्सवर जास्त सक्रिय असतात.

विद्रोह मांडण्यासाठी रॅप महत्त्वाचा..!

कोल्हापूरच्या रॅप संस्कृतीला स्थानिक युवा पिढीने मोठा प्रतिसाद दिला आहे. सोशल मीडिया आणि रॅप संगीताच्या व्हिडिओंमुळे, आज कोल्हापूरच्या अनेक रॅप कलाकारांचे गाणे इंटरनेटवर वाऱ्यासारखे पसरले आहे. ''राज्य माध्यमातून युवा वर्गाचा आक्रोश आणि वारंवार सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर आपण भाष्य करू शकतो. तसेच विद्रोह मांडू शकतो'' अशी भावना 'लोकल 18' शी बोलताना एनिवर्स म्हणजेच अनिकेत कांबळे याने बोलताना दिली.

advertisement

रॅपमध्ये लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापुरात रॅपर्सची संस्कृती वाढत आहे. यात फक्त तरुण वर्गच नाही तर अगदी शाळकरी मुले ही रॅपिंग करताना दिसत आहेत. यात रणवीर तोडकर या इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने 'लोकल 18' ला रॅप करून दाखवला. अतिशय उत्स्फूर्तपणे केलेल्या या रॅपला कोल्हापूरकरांनी, या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

advertisement

कोल्हापूरकरांना आकर्षित करतंय रॅप कल्चर!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

कोल्हापुरातील युवा पिढी सह शाळकरी मुलांनाही या रॅप कल्चरची भुरळ पडत आहे. रॅप हे वास्तविकतेवर व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम आहे. हे माध्यम आणखी प्रगल्भ करण्यासाठी कोल्हापूरकरांनी या स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे मत कलाकार नदीम (शातिर शेर) ने व्यक्त केले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
'मोठं मोठं बोलून होत नसते क्रांती..' अस्सल कोल्हापुरी गली बॉय, एकदम नादखुळा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल