किती आहे किंमत आणि कालावधी काय?
वार्षिक फास्टॅग काढण्यासाठी संबंधित लिंक राजमार्ग यात्रा मोबाईल ॲप, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वार्षिक फास्टॅग पासची किंमत 3000 रुपये असून तो एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा 200 एकेरी वाहन्यांच्या फेऱ्यांसाठी (जे आधी होईल ते) लागू आहे. जी खासगी वाहने केवळ सुट्टी आणि सणांच्या कालावधील परजिल्हा, परराज्यात जातात, त्यांच्यासाठी हा पास लागू होणार नाही. पण राष्ट्रीय महामार्गावर वैक्तिगत वापरातील अव्यवसायिक वाहनांना (कार, जीप, व्हॅन) हा पास वापरता येणार आहे.
advertisement
कोल्हापूर, सांगली, सातारा येथील वाहनधारकांना होणार फायदा
यासंदर्भातील आदेश गुरूवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूरच्या प्रकल्प संचालकांनी जाहीर केलेला आहे. त्यामुळे या निर्णयाचा फायदा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील वाहनधारकांना होणार आहे. असे असले तरी, या पासचा फायदा केवळ जे नेहमी पर्यटनासाठी किंवा इतर कारणांसाठी बाहेर जातात, त्यांनाच याचा विशेष फायदा होणार आहे. मे महिन्याची सुट्टी, दिवाळी, नाताळ, गणपती या सणांच्या कालावधीत परजिल्ह्यात किंवा परराज्यात जातात. त्यांच्याकडून वर्षभरात 200 फेऱ्या होणं शक्य नाही, अशाही प्रतिक्रिया नागरिकांनामधून येत आहेत.
हे ही वाचा : 'तो' रोज बस प्रवासात देतोय त्रास, आईला सांगितला प्रकार, पण.. अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन!
हे ही वाचा : वर्गमित्राला Reels बववण्यासाठी हवी होती साडी; पण मैत्रिणीला गमवावा लागला जीव, कोल्हापूरात घडला भयंकर अपघात!
