मक्याचे दर गडगडले: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 42 हजार 127 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 10 हजार 097 क्विंटल मक्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1067 ते जास्तीत जास्त 2133 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल मक्यास 2213 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक: राज्याच्या मार्केटमध्ये आज 1 लाख, 85 हजार 537 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 95 हजार 712 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 364 ते जास्तीत जास्त 1941 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 410 क्विंटल कांद्यास 1600 तेण 2750 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
सोयाबीनच्या काही वाणांना हमीभावाहून अधिक दर? राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 40 हजार 390 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी वाशिम मार्केटमध्ये सर्वाधिक 24 हजार 500 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3910 ते 4505 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच वाशिम मार्केटमध्येच आवक झालेल्या 6000 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 3975 ते 7500 प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच अमरावती, धुळे, जलना आणि बुलढाणा मार्केटमध्ये देखिल हमी भावाहून अधिक भाव मिळाला आहे.
बाजारात आवक जरी वाढली असली तरी गुणवत्तापूर्ण सोयाबीनची उपलब्धता मर्यादित आहे.
निर्यात मागणीतील वाढ आणि हवामान अनुकूल राहिल्यामुळे दरात स्थिरता आणि काही ठिकाणी तेजी दिसून आल्याचे व्यापारी सांगतात.
मात्र 'ठोस कारण नसताना काही व्यापाऱ्यांकडून विशेष वाणाला अधिक दर देऊन खरेदी होत आहे. यातून शेतकऱ्यांच्या पिळवणूकीचा नवा फंडा रचल्याचे' अनुभवी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.