मक्याचे दर गडगडले: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 3 हजार 111 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी बुलढाणा मार्केटमध्ये 6 हजार 890 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1450 ते जास्तीत जास्त 1806 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल मक्यास 2400 ते 2600 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याचे भाव भूईसपाट: राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 69 हजार 438 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 79 हजार 778 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 332 ते 1619 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सांगली मार्केटमध्ये आवक झालेल्या 40 क्विंटल कांद्यास 3500 ते 4000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
सोयाबीनची आवक स्थिर: राज्याच्या मार्केटमध्ये 93 हजार, 429 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये 23 हजार 381 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4100 ते 4870 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 18 हजार 135 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 3900 ते 5171 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.