मक्याचे दर गडगडले: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 52 हजार 527 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी अमरावती मार्केटमध्ये 15 हजार 304 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1403 ते जास्तीत जास्त 1730 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 527 क्विंटल मक्यास 2800 ते 3500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 1लाख, 96 हजार 081 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख, 01 हजार 182 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 354 ते 1876 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 882 क्विंटल पांढर्या कांद्यास 200 ते 3300 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
सोयाबीनची आवक स्थिर: राज्याच्या मार्केटमध्ये 86 हजार, 152 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये 19 हजार 032 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4100 ते 4705 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 12हजार, 117 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 6000 प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.