मक्याच्या भावात किंचित वाढ: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 62 हजार, 734 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 12 हजार 028 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1040 ते जास्तीत जास्त 1873 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 443 क्विंटल मक्यास 2800 ते 3500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 76 हजार 405 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 91 हजार 073 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 313 ते 1455 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 14 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 2310 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
सोयाबीनची आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 79 हजार 547 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये 20 हजार, 284 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4058 ते 4639 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 3000 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4128 ते 5350 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
हळदीस चांगला उठाव: राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज एकूण 1612 क्विंटल हळदीची एकूण आवक झाली. यापैकी हिंगोली मार्केटमध्ये आवक झालेल्या 1400 हळदीस 12050 ते 14050 दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच सांगली मार्केटमध्ये आवक झालेल्या 192 राजापुरी हळदीस 11550 ते 15850 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.