गुळास चांगला उठाव: राज्याच्या मार्केटमध्ये 3411 क्विंटल गुळाची एकूण आवक झाली. यापैकी 1478 क्विंटल सर्वाधिक आवक सांगली बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4216 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 53 क्विंटल गुळास प्रतीनुसार 5200 ते 5700 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
आले दरात चढ-उतार: राज्याच्या मार्केटमध्ये 2205 क्विंटल आल्याची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 1147 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3600 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 7 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 4505 ते 6505 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
तीळास चांगला उठाव: आज राज्याच्या मार्केटमध्ये 11 क्विंटल तीळाची एकूण आवक राहिली. यापैकी अकोला मार्केटमध्ये 7 क्विंटल तीळाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 9975 ते 10400 हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.