नेमकं काय आहे प्रकरण?
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील राजगड येथील नेहा विशाल चव्हाण ही विवाहित महिला तिच्या पतीशी झालेल्या वादामुळे एक वर्षापासून अकोला जिल्ह्यातील राजनखेडा येथे राहत होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असल्याने तिला महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ मिळत होता. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी महिलेने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या डोणगाव शाखेमध्ये बचत खाते उघडले. या खात्यामध्येच लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत होते.
advertisement
महिलेचा पती विशाल चव्हाण हा दुसऱ्या महिलेला बँकेत घेऊन गेला आणि त्याने बनावट सही करून पत्नीच्या खात्यातून 2800 रुपये काढले. यानंतर अशाच प्रकारे त्याने दुसऱ्यांदा 3 हजार रुपये काढले. बँक कर्मचाऱ्यांनी दोन्ही वेळा चौकशी केली नाही, असा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
'तपासासाठी बँकेमधील सीसीटीव्ही फुटेज पाहिले जातील. विथड्रॉवल स्लिपमध्ये स्वाक्षऱ्या बघितल्यानंतरच आम्ही या घटनेबाबत सांगू शकतो', असं महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेचे अधिकारी सचिन गोडे म्हणाले आहेत.
