TRENDING:

महायुतीच्या मंत्र्यावर जमीन लाटल्याचा आरोप, सरनाईकांनी सगळे आरोप फेटाळले, पुरावेच दिले!

Last Updated:

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी  प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन लाटल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : महाराष्ट्रात एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं चिरंजिव पार्थ पवार यांचं पुण्यातील 1800 कोटी जमीन गैरव्यवहार प्रकरण गाजत असताना आता आणखी महायुती सरकारमधील मंत्र्यावर जमीन लाटल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यामुळे खळबळ उडाली. अखेरीस शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्या व्यवहारावर खुलासा केला आहे.
News18
News18
advertisement

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी  प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन लाटल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळा व्यवहार हा कायदेशीर असल्याचं सांगितलं आहे.

अशी कुठलीही जमीन मी स्वतः लाटलेली नाही. दुपारी 12 वाजेपर्यंत मी विजय वडेट्टीवार यांच्या पत्रकार परिषदेची वाट पाहत होतो मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली नाही.  माझ्या सुनेच्या सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेने 8 हजार 25 sq मीटर जमीन घेतली आहे. ही जमीन शैक्षणिक कारणासाठी घेतलेली जमीन आहे.यासाठी 4 कोटी 55 लाख रुपये रक्कम भरून कब्जे वहिवाटीला घेतली आहे. त्याव्यतिरिक्त 1 कोटी 28 लाख रुपयांची रजिस्ट्रेशन फीस भरली आहे. शासनाच्या सर्व प्रकिया पुर्ण करून जमीन घेतली आहे, असं स्पष्टीकरण सरनाईक यांनी दिलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नवरा-बायकोनं पाहावी अशी बातमी, अंजलीबाई-आकाशच्या लव्हस्टोरीवर येतोय सिनेमा!
सर्व पहा

तसंच,  हा व्यवहार शासनाची प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर पूर्ण झाली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल. विजय वडेट्टीवार यांना मी अब्रू नुकसानीची नोटीस पाठवणार होतो. मात्र, मी त्यांना स्वतःहून फोन करून या सर्व गोष्टीची माहिती दिली त्यानंतर त्यांना देखील ही समजलं आहे. एवढ्या मोठ्या नेत्यानं अशा प्रकारे आरोप करणे चुकीचं आहे. आरोप करताना विचार करून, शहानिशा करून करावा. ही केवळ लीज वर दिलेली शासनाची जमीन आहे, असे प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महायुतीच्या मंत्र्यावर जमीन लाटल्याचा आरोप, सरनाईकांनी सगळे आरोप फेटाळले, पुरावेच दिले!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल