खऱ्या प्रेमाची गोष्ट! प्रत्येक नवरा-बायकोनं पाहावी अशी बातमी, अंजलीबाई-आकाशच्या लव्हस्टोरीवर येतोय सिनेमा!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापुरातील अंजली आणि आकाश हे दोघेजण सोशल मीडियावर हसवणारे व्हिडिओ टाकून लाखोंचा चाहता वर्ग तयार केला आहे.
सोलापूर : अंजली आणि आकाश नारायणकार हे सोलापूरमधील लोकप्रिय रीलस्टार कपल असून खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे पती-पत्नी आहेत. सोलापूरमध्ये राहणाऱ्या या कपलची खऱ्या आयुष्यातील संघर्षमय प्रेरणादायी प्रेम कथा आता मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या रूपात दिसणार आहे. सोलापुरातील अंजली आणि आकाश हे दोघेजण सोशल मीडियावर हसवणारे व्हिडिओ टाकून लाखोंचा चाहता वर्ग तयार केला आहे.
अंजली शिंदे यांच्या लग्नानंतर अपघात, ब्रेन ट्यूमर, त्यानंतर शरीराच्या उजव्या बाजूला पॅरलिसिस झाली. पण आकाशने तिची साथ कधीच सोडली नाही आणि याच त्यांच्या या संघर्षमय जीवनाची प्रेम कहाणी 'लव यू मुद्दू' ह्या कन्नड चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या संदर्भात अधिक माहिती आकाश नारायणकर यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
एका जमान्यात असं म्हटलं जात होतं की सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाच्या दारातून परत आणले होते पण सोलापुरात राहणाऱ्या आकाश नारायणकर यांनी अंजली शिंदे यांचे प्राण यमाच्या दारातून परत आणले, असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. सोशल मीडियावर अंजली बाई या नावाने प्रसिद्ध असलेल्या रील स्टार अंजली शिंदे यांचे हसवणारे व्हिडिओ सर्वांनाच माहीत आहे आणि चांगलेच व्हायरल देखील होत आहेत.
advertisement
याच सोशल मीडियावर तिचा जोडीदार नारायण देखील फेमस आहे. सोशल मीडियावर मनोरंजनात्मक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा लाखोंचा चाहता वर्ग देखील आहे. लग्नानंतर या दोघांच्या जोडीला वाईट दृष्ट लागली आणि अंजलीचा अपघात झाला. त्यानंतर ब्रेन ट्यूमरचे निदान झाले. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली पण अंजली शिंदे यांच्या शरीराची उजवी बाजूला पॅरालिसिस झाली. पण आकाशने तिची साथ सोडली नाही, मोठमोठ्या दवाखान्यात अंजलीचे उपचार केले आणि मानसिक आधार दिला. अंजली आणि नारायण यांच्या खऱ्या आयुष्यातील आणि जीवनातील संघर्ष यावर आधारित 'लव यू मुद्दू' हा कन्नड चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
advertisement
'लव यू मुद्दू' या चित्रपटाचे दिग्दर्शक कुमार यांनी येऊन आकाश यांच्याशी संपर्क केला आणि त्यानंतर या चित्रपटाला सुरुवात झाली. 'लव यू मुद्दू' याचा अर्थ म्हणजे बाळ असा होतो तर या चित्रपटाची संपूर्ण चित्रीकरण कर्नाटक आणि केरळच्या भागात झाले आहे. आकाश आणि अंजली यांनी कधीही विचार केला नव्हता की आपल्या संघर्षमय, प्रेरणादायी जीवनावर चित्रपट तयार केला जाईल. आताही आकाश आणि अंजली या दोघांना त्यांच्या जीवनावर चित्रपट तयार झाला आहे हे ते स्वप्न पाहत आहेत की काय असं वाटत आहे, अशी प्रतिक्रिया आकाश नारायणकर यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
November 08, 2025 7:00 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
खऱ्या प्रेमाची गोष्ट! प्रत्येक नवरा-बायकोनं पाहावी अशी बातमी, अंजलीबाई-आकाशच्या लव्हस्टोरीवर येतोय सिनेमा!

