महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ देण्याची व्यवस्था आहे. गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ राज्यातील कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे सरकारला सामाजिक स्तरावर मोठा लाभ मिळाला आहे आणि विधानसभा निवडणुकीतही या योजनेचा सकारात्मक परिणाम दिसून आलेला आहे.
advertisement
मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान अनेक गैरप्रकार आणि फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. काही लाभार्थी पात्रतेच्या निकषांची अज्ञातपणे किंवा जानबुजून उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सरकारकडून तपासणी आणि आवश्यक सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे. अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणानुसार, अनेक अपात्र लाभार्थी नोंदणी करून योजना वापरत असल्याचे दिसून आले. यामुळे फक्त गैरप्रकार थांबवणे नाही तर वास्तविक पात्र महिलांपर्यंत योजना पोहोचविणे हा उद्देश अधिक महत्वाचा ठरतो.
योजनेतील लाभ थांबण्याची शिफारस झाल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींमध्ये चिंता आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. सरकारकडून ही शिफारस अंतिम निर्णय नाही, परंतु ती योजनेतील पारदर्शकता आणि धोरणात्मक सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची आहे. या परिस्थितीत, लाभार्थींनी स्वतःच्या पात्रतेची खात्री करून शासनाच्या मार्गदर्शनानुसार नोंदणी अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
लाडकी बहीण योजने सारख्या समाजकल्याणकारी योजनांचा उद्देश खऱ्या गरजूंना आर्थिक सहाय्य देणे हा असतो. परंतु, गैरप्रकारामुळे हा उद्देश धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे योजनेची कार्यवाही अधिक कडक आणि पारदर्शक करण्याची गरज आहे.