TRENDING:

Latur: दारू, चिकन अन् कार; बिचाऱ्या गोविंदला गणेशनं असं फसवलं, वेब सीरिजला लाजवेल अशी टाइमलाईन!

Last Updated:

गोविंद यादव हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात राहणारे एक शेतकरी होते. लामजनी पाटी इथं ते आले होते. तिथून ते आपल्या घराकडे जात होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शशिकांत पाटील, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

लातूर: 'कानून के हात लंबे होते है' हिंदी सिनेमात आपण आजपर्यंत कित्येक वेळा हा डॉयलॉग ऐकला असेल. पण, याचा प्रत्यय नुकताच लातूरमध्ये एका घटनेत समोर आला आहे. फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश कर्जाच्या जाळ्यात फसला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने एका ५० वर्षीय इसमाचा कारमध्ये जिवंत जाळलं. अत्यंत थंड डोक्याने गणेशने या ५० वर्षांच्या इसमाला फसवलं, त्याची माहिती आता समोर आली आहे.

advertisement

लातूरमधील औसा तालुक्यात वानवडा इथं शनिवारी रात्रीच्या सुमारास कार जळीत हत्याकांड घडलं. आरोपीचं नाव हे गणेश चव्हाण असं आहे. तर  गोविंद किसन यादव (वय ५०) असं मृत इसमाचं नाव आहे. सुरुवातील गणेश चव्हाण याने आपल्या मृत्यूचा बनाव केला होता. पण, पोलीस तपासात गणेश चव्हाण यांने टर्म इन्शुरन्सचे १ कोटी रुपये लाटण्यासाठी गोविंद यादव या इसमाला कारमध्ये जिवंत जााळलं.

advertisement

गोविंद यादव कुठे भेटले?  

गोविंद यादव हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात राहणारे एक शेतकरी होते. लामजनी पाटी इथं ते आले होते. तिथून ते आपल्या घराकडे जात होते. घराकडे जात असताना गोविंद यादव यांनी दारू प्यायली होती. गोविंद हे   औसा तालुक्याला चालले होते. गणेश चव्हाण याने गोविंद यांना पाहिलं आणि त्याच्या डोक्यात प्लॅन शिजला. गणेश चव्हाण याने गोविंद यादव यांच्याशी गोड गोड बोलून आपल्या कारमध्ये बसवलं.

advertisement

पुढे जाऊन एका धाब्यावर त्याने कार थांबवली. तिथे गणेशनं गोविंद यांना परत दारू पाजली. स्वत: ही दारू प्यायला. गणेश चव्हाण याने मुद्दाम गोविंद यांना जास्त प्रमाणात दारू पाजली. तिथे दोघांनी चिकन थाळीवर ताव मारला. आता दारू जास्त झाल्यामुळे गोविंद हे शुद्धीवर नव्हते. गणेशला जे पाहिजे होतं, तसंच झालं होतं. शुद्धीवर नसलेल्या गोविंद यांना  कारमध्ये समोरच्या सीटवर बसवलं आणि औसा तालुक्यात वानवडा पाटी ते वानवडा रोडवर या निर्जनस्थळी घेऊन गेला.

advertisement

माचिसच्या काड्या आणि कारचं डोअर लाँक  

दारू जास्त झाल्यामुळे गोविंद यादव हे झोपी गेले होते. हीच संधी साधून गणेश चव्हाण याने कारमध्ये असलेल्या  माचिसमधील काड्या गोविंद यांच्या आजूबाजूला टाकल्या. गोविंद यादव यांना जर जाग आली आणि पळण्याचा प्रयत्न केला तर म्हणून सीट बेल्ट तर लावला, सोबतच एक कपड्यानेही बांधून ठेवलं. गोविंद यादव यांच्या आजूबाजूला माचिसच्या काड्या टाकून दिल्या. एवढंच नाहीतर कारचा स्फोट झाला पाहिजे, असं लक्षात ठेवून गणेशनं कारच्या पेट्रोलच्या टाकीचं झाकण हे उघडं ठेवलं.

गोविंद यांनी कारचा हॉर्न वाजवला पण...

गणेश बाहेर आला आणि त्याने कारला आग लावून दिली. बघता बघता कारने आगीचं रौद्ररुप धारण केलं. आग लागल्यामुळे कारमध्ये असलेल्या गोविंद यादव यांना जाग आली, त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण, सीट बेल्ट लावलेला होता आणि दारही बंद होतं. त्यांनी जीव वाचवण्यासाठी कारचा हॉर्न वाजवला. पण, निर्जनस्थळ असल्यामुळे काही उपयोग झाला नाही. बघता बघत कार आगीच्या भक्षस्थानी सापडली आणि गोविंद यांचा कारमध्ये जळून कोळसा झाला. गोविंद यांचा मृत्यू होईपर्यंत गणेश हा तिथेच उभा होता.

गणेश खासगी बसने कोल्हापूरला पळाला

काम फत्ते झाल्यानंतर गणेश चव्हाण याने घटनास्थळावरून पळ काढला.  खासगी बसने त्याने आधी कोल्हापूर गाठलं. पुढे तो एसटीने विजयदुर्गमध्ये जाऊन पोहोचला. पण तिथे गेल्यावर तो आपल्याकडे असलेल्या आणखी एका फोनवरून आपल्या मैत्रिणींना मेसेज करत होता. त्याची हीच चूक त्याला महागात पडली. पोलिसांनी लातूरमध्ये जेव्हा गणेश चव्हाण कोण आहे, याचा तपास सुरू केला तेव्हा त्याच्या एका मैत्रिणीजवळ पोलीस पोहोचले. घटना घडली होती १२ च्या सुमारास पण त्यानंतरही गणेश हा मैत्रिणीला मेसेज करत होता.  मेसेज, चॅट सुरू होते. त्यामुळे पोलिसांना  संशय बळावला आणि त्यांनी फोनचा पाठलाग सुरू केला आणि विजयदुर्गमधून गणेशला ताब्यात घेतलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा उलथापालथ, मंगळवारी कांदा आणि मक्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

औसा पोलीस स्टेशनमध्ये गणेश चव्हाण याच्यावर गोविंद यादव याचा खून केला या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केलाय. आरोपी गणेश सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. गणेशनं इतक्या थंड डोक्याने हा कट रचला, यामध्ये त्याला कुणी मदत तर केली नाही ना, असा पोलिसांना संशय आहे. याचा तपास आता पोलीस करत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur: दारू, चिकन अन् कार; बिचाऱ्या गोविंदला गणेशनं असं फसवलं, वेब सीरिजला लाजवेल अशी टाइमलाईन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल