काय आहे प्रकरण?
उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, फिर्यादी प्रा. सदाविजय बसवप्रकाश विश्वनाथे (32, रा. कल्पना चौक, उदगीर) यांना आरोपी गफार इस्माईल पठाण उर्फ बबलू पठाण (रा. समतानगर, उदगीर), पवन बिरादार शिरोळकर, बालाजी व अनोळखी इसम यांनी आपसात संगनमत केले. या चौघांनी सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शहरातील बिदर गेट येथून फिर्यादीचे अपहरण केले. त्यांना सुरुवातीला लातूर, औराद शहाजानी येथे नेऊन प्लॉस्टिक पाईप व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फियादीकडे 50 लाख रुपये खंडणीची मागणी केली. तसेच फियादी व त्याच्या मित्रांकडून ऑनलाईन पध्दतीने बळजबरीने पैसे मागवून घेतले. तद्नंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या एटीएममधून रोख रक्कम काढण्यास फिर्यादीस भाग पाडले. एकूण 8 लाख 14 हजार रोख काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या बॉन्ड खरेदी व बँकेच्या चेकवर सह्या घेतल्या.
advertisement
वाचा - 'तू मला खूश केलं नाहीस तर...' पोलीस अधिकाऱ्याचा तक्रारदार महिलेला फोन, ऑडिओ क्लिप व्हायरल
ही माहिती घरच्यांना दिली तर तुला जीवे ठार करू अशी दमदाटी देऊन भालकी येथे सोडून देऊन निघून गेले, अशी फिर्याद प्राध्यापक सदावीजय विश्वनाथे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
