TRENDING:

Latur News : लातूरमध्ये जन्मदात्या आईवर 75 कोयत्याचे वार; गुन्हा लपवण्यासाठी मृतदेहासोबत संतापजनक काम

Last Updated:

Latur News : लातूरमध्ये पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहासोबत घृणास्पद काम केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लातूर, (नितिन बनसोडे, प्रतिनिधी) : संपत्तीवरुन होणारे वाद आपल्याकडे नवीन नाहीत. अनेकदा हा विषय चर्चेतून सुटतो. मात्र, काही वेळा वाद टोकाला जाऊन ऐकमेकांचे जीव घेण्यापर्यंत मजल जाते. अशाच एका घटनेने लातूर जिल्हा हादरला आहे. संपत्तीसाठी पोटच्या मुलानेच आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. आईच्या अंगावर कोयत्यानं 70 ते 75 वार करून तिच्या शरीराचे तुकडे केले होते. अखेर पोलीस तपासात याचा उलगडा झाला.
क्राइम न्यूज
क्राइम न्यूज
advertisement

आईचा खून करुन पुरावा केला नष्ट

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर ग्रामीण पोलीस ठण्याच्या हद्दीत हॉटेल व्यावसाय करणाऱ्या 55 वर्षीय महिलेचा अत्यंत निर्दयी आणि क्रूरपणे खून करण्यात आला. महिलेच्या अंगावर 70 ते 75 कोयत्याचे वार करून तिला जीवे मारल्याची घटना 24 फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यानंतर आरोपीचा शोध घेऊनही आरोपी मिळत नव्हते, तेव्हा पोलिसांनी मयत सखुबाई वाघमारे यांचा मुलगा नागनाथ वाघमारे याची कसुन चौकशी केली असता प्रॉपर्टीसाठी आईच्या अंगावर कोयत्याने 70 ते 75 वार करून तिचा खून करून तिच्या अंगावरचे सर्व कपडे काढून टाकून पुरावे नष्ट केल्याची धक्कादायक कबूली दिली. कोणीतरी बलात्कार करून खून केला असावा असा अंदाज पोलीस करतील आणि माझ्यावर संशय येणार नाही. त्यामुळे हा बनाव केल्याचे देखील आरोपी नागनाथ वाघमारे याने कबुल केला. या प्रकरणी आरोपी मुलाविरोधात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

रेशनकार्डासाठी मुलाने आई-वडिलांना संपवलं

काही दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे वृद्ध दाम्पत्याच्या हत्येच छडा लावण्यास पोलिसांना यश आले. ह्या हत्या पोटच्या मुलाने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेशनकार्ड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. भीमराव गणपती कुंभार (वय 70) आणि त्यांच्या पत्नी सुसाबाई ऊर्फ सुशीला कुंभार (वय 65) यांची राहत्या घरात गेल्या 29 फेब्रुवारी रोजी रात्री हत्या झाली होती.

advertisement

वाचा - महिला डॉक्टरने इंजेक्शन टोचून घेत संपवलं जीवन, पत्रात पोलिसावर गंभीर आरोप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्ही कधी खाल्लीये का मासे चकली? दुर्गा यांचा व्यवसाय हिट,महिन्याला 1 लाख कमाई
सर्व पहा

तपास करताना संशयाची सुई विभक्त राहणारा मुलगा समाधान कुंभार (वय 42) याच्या दिशेने गेली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. समाधान हा आई-वडिलांकडे गेल्या दहा दिवसांपासून रेशनकार्ड मागत होता. आई सुशीला हिने रेशनकार्ड सापडत नसल्याचे सांगितले तेव्हा समाधान याने घर धुंडाळू लागला असता आईने विरोध केला. त्याचा राग मनात धरून समाधान याने आईचा गळा दाबून नंतर नायलॉनच्या दोरीने गळफास देऊन खून केला. त्यानंतर वडिलांचाही खून केला, असे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एस. खणदळे यांनी सांगितले. दरम्यान, समाधान कुंभार यास 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur News : लातूरमध्ये जन्मदात्या आईवर 75 कोयत्याचे वार; गुन्हा लपवण्यासाठी मृतदेहासोबत संतापजनक काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल