या भूकंपात अंदाजे ७,९२८ माणसे मृत्युमुखी पडले, १५,८५४ जनावरांचा मृत्यू झाला, तर सुमारे १६,००० लोक जखमी झाले होते. ५२ गावांतील ३० हजार घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर १३ जिल्ह्यांतल्या २ लाख ११ हजार घरांना तडे गेले. ६.०४ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूंकप होता
तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी भूकंप झाल्यानंतर अवघ्या काही तासांत घटनास्थळी भेट देऊन सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. या घटनेची भिषणता एवढी होती की, भूकंपानंतर तेथील नागरिकांसाठी शरद पवार यांनी काही काळ मंत्रालयत सोलापूरमधून चालवण्याचा निर्णय घेतला होता. आज या घटेनेला तीस वर्ष पूर्ण झाले आहेत.
advertisement
दरम्यान या घटनेला तीस वर्ष पूर्ण झाले आहेत, या भूंकपाच्यावेळी तेथील नागरिकांना तत्कालीन पवार सरकारने मोठी मदत केली होती. शरद पवार यांनी काही काळ आपलं मंत्रालय सोलापुरातून चालवले होते. याची आठवण म्हणून आणि कृतज्ञा व्यक्त करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी आज शरद पवार किल्लारी दौऱ्यावर आहेत.
