राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली. एकूणच लोकसभा मतदार संघात प्रचाराचा आढावा घेतला असता मतदार संघात भाजपच्या वतीने विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना दुसऱ्यांदा मैदानात उतरवण्यात आलं, तर दुसरीकडे काँग्रेसकडून लातुरातले प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली . उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या वतीने प्रचारासाठी गावागावात यंत्रणा उभी करत प्रचार करण्यात आला. अखेर या चुरशीच्या लढाईमध्ये काळगे यांचा विजय झाला आहे.
advertisement
भाजपच्या वतीने सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांनी लातूर जिल्ह्यात सभा घेतल्या, आधी चंद्रशेखर बावनकुळे, चित्रा वाघ, विनोद तावडे यांच्या सभा झाल्या त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या, शेवटी नितीन गडकरी यांची देखील सभा झाली. दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवारासाठी बाळासाहेब थोरात, सुषमा अंधारे आणि प्रियांका गांधी यांच्या सभा झाल्या. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या मतदासंघातून काळगे यांनी बाजी मारली आहे.
