TRENDING:

NEET पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात; लातूरमध्ये दोन ZP शिक्षकांची चौकशी, एकाला अटक

Last Updated:

लातूरमधील दोन शिक्षकांसह नांदेड आणि दिल्लीतील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका शिक्षकाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातही सापडले आहेत. लातूरमधील दोन शिक्षकांसह नांदेड आणि दिल्लीतील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका शिक्षकाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रात एटीएसने कारवाई करत दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना सोडूनही देण्यात आलं होतं. मात्र आता रविवारी रात्री एकाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली.
News18
News18
advertisement

एटीएसने दोन्ही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना रविवारी रात्री पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. त्यांच्या फोनमध्ये काही हॉल तिकिटे आणि पैशांची देवाण-घेवाण केल्याचे पुरावे मिळाले आहेत. एटीएसने दोन्ही शिक्षकांना लातूर पोलिसांच्या ताब्यात दिलंय. लातूर पोलिसांनी एका शिक्षकाला अटकसुद्धा केली आहे.

संजय तुकाराम जाधव, जलिलखा उमरखान पठाण हे दोघेही पैसे घेऊन परीक्षा उत्तीर्ण करण्याचं रॅकेट चालवत असल्याची माहिती समजली. त्यानंतर एटीएसने लातूरमध्ये प्राथमिक चौकशी केली. तेव्हा मोबाईलमधील माहिती, फोन गॅलरीत असलेल्या हॉल तिकीट आणि चॅटिंगबद्दल समाधानकारक खुलासा त्यांना करता आला नाही. तसंच एका विद्यार्थ्याचे हॉल तिकिट पेपर लीक प्रकरणातील संशयिताला पाठवल्याचं समोर आलंय.

advertisement

नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल, तपास सीबीआयकडे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्ही कधी खाल्लीये का मासे चकली? दुर्गा यांचा व्यवसाय हिट,महिन्याला 1 लाख कमाई
सर्व पहा

एटीएसने संजय तुकाराम जाधव, जलीलखान उमरखान पठाण, इरन्ना मष्णाजी कोनगलवार आणि गंगाधर या चौघांविरोधात नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला एनटीएकडून आयोजित करण्यात आलेली युजीसी नेट परीक्षाही पुढे ढकलण्यात आलीय.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
NEET पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात; लातूरमध्ये दोन ZP शिक्षकांची चौकशी, एकाला अटक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल