TRENDING:

इंग्रजी शाळेत घालायला पैसे नाहीत, चांगलं शिक्षण देता येईना; आईने मुलीसह जीवन संपवलं

Last Updated:

पैसे नसल्यानं मुलांना सीबीएसई इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडलीय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लातूर : पैसे नसल्यानं मुलांना सीबीएसई इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडलीय. भाग्यश्री व्यंकट हालसे असं आईचं नाव असून तिने मुलगी समीक्षा हिच्यासह विहिरीत उडी मारून जीवन संपवलं. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. आई आणि मुलीच्या आत्महत्येने माळेगावमध्ये खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माळेगाव इथं व्यंकट हालसे हे त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत राहतात. दीड एकर शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्यानं दोन्ही मुलांना इंग्रजी शाळेत घालणं शक्य नव्हतं. तर दुसरीकडे व्यंकट यांची पत्नी भाग्यश्री यांना मुलांनी इंग्रजी शाळेत शिकावं असं वाटत होतं. त्यासाठी पतीकडे मुलांना सीबीएसई शाळेत पाठवण्याची विनंती करत होत्या.

advertisement

आत्महत्येआधी पतीला फोन

पती व्यंकट यांनी पत्नी भाग्यश्रीची अनेकदा समजूत काढली. पण मुलांना इंग्रजी शाळेत शिकवता येत नसल्यानं पत्नी नैराश्यात गेली. शेवटी मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास मुलीसह भाग्यश्री यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिथून पतीला फोन करून मुलीचं शेवटचं तोंड पाहा म्हटलं आणि विहिरीत उडी घेतली.

चिमुकला खेळायला गेल्याने वाचला

advertisement

भाग्यश्री हालसे या मुलीसोबत आत्महत्या करण्यासाठी जात असताना मुलगा बाहेरच खेळत होता. त्यालाही घेऊन त्या निघाल्या होत्या. मात्र खेळण्यासाठी मुलगा सार्थकने हात सोडवून घेत तिथून पळ काढला. मुलगा खेळायला गेल्याने वाचला.

आईच्या निधानानंतर नैराश्यात

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्ही कधी खाल्लीये का मासे चकली? दुर्गा यांचा व्यवसाय हिट,महिन्याला 1 लाख कमाई
सर्व पहा

भाग्यश्री या गेल्या वर्षभरापासून नैराश्यात होत्या. गेल्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. तेव्हापासून सतत दु:खात असत. आईच्या आठवणीत रडत असायच्या. त्यातून नैराश्य आलं होतं असं भाग्यश्री यांच्या भावाने पोलिसांना सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
इंग्रजी शाळेत घालायला पैसे नाहीत, चांगलं शिक्षण देता येईना; आईने मुलीसह जीवन संपवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल