मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर देण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. या जीआर विरोधात कोर्टात जाण्याची धमकी दिली आहे. मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे.
'याला आता विसरभोळा मंत्री म्हणायचं. ते आता अंधश्रद्धा बाळगत आहे. ते 32 टक्के खातात, असा मंत्री देशात आहे का कुणी? आतापर्यंत याने आमचं आरक्षण खाल्लं आहे ते आम्ही परत घेत आहे. तुम्ही इतके दिवस आरक्षण खात आहे. आता तुम्ही प्रगत झाला तर आरक्षण सोडून द्या. राजकारणापायी हे ओबीसींना उलटं सांगत आहे. याला नेपाळ किंवा इंग्लडल सोडून या, अशी टीका जरांगे यांनी केली.
advertisement
टआरक्षण रद्द करायचं आहे का? तुम्ही इतके दिवस खात होता ते रद्द करायचं आहे का? तुम्ही आता प्रगत झाला आहे. तर ते आरक्षण सोडाना. तुमचं अजूनही पोट भरत नाही का? भरत्या, शिक्षण सगळं यांनीच खाल्लं आहे. राजकारणापायी हे ओबीसींना उलटे समजाऊन सांगत आहे. याच ऐकू नका. हा मेटाकुटीला आला आहे, डोळे लाल दिसू नये म्हणून याने आज काळा चष्मा घातला आहे. याला आता यापुढे विसरभोळा मंत्री नाव द्यावे. म्हाज्योती योजनेला हजारो कोटी दिले तेव्हा आम्ही काही म्हणालो आहे का? सारथीला आत्ता यायला लागले. वेडा वाकडा जीआर याने 1994 ला काढायला लावला. मराठ्यांनी मर्दानगी दाखवून आता पर्यत मिळवलं आहे. असंही जरांगे म्हणाले.