मका आवक: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 2 हजार 165 क्विंटल मक्याची एकूण आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 1 हजार 665 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1300 ते जास्तीत जास्त 2399 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल लाल मक्यास प्रतीनुसार 2500 ते 2800 रुपये भाव मिळाला.
advertisement
कांद्याची आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 20 हजार 398क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 4 हजार 820 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 351 ते जास्तीत जास्त 1153 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 121 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार कमीत कमी 300 ते जास्तीत जास्त 1600 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला.
सोयाबीन उत्पादकांची कोंडी: राज्याच्या मार्केटमध्ये 39 हजार 473 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये सर्वाधिक 21 हजार 288 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3725 ते 4303 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच नांदेड मार्केटमध्ये 232 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास प्रतीनुसार 4126 ते 4450 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.