TRENDING:

नवरात्री गरबा-दांडियामध्ये करा सोप्या आणि खास स्टेप्स; कोरिओग्राफर गौरी नार्वेकर यांच्याकडून शिका हटक्या स्टेप्स

Last Updated:

नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होत असताना, कळव्यातील डान्स कोरिओग्राफर गौरी नार्वेकर यांनी खास गरबा वर्कशॉप आयोजित करून तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून त्या "गौरी डान्स कट्टा" या नावाने डान्स क्लासेस चालवत असून, बॉलिवूड, हिपहॉप, कंटेम्पररीसारख्या विविध नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण देतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

नवरात्रनिमित्त ‎छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल, बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग कोणते?

गौरीताईंनी गरबा आणि रास यामधील फरक समजावून सांगताना म्हटलं, "गरबा हा सर्कलमध्ये खेळला जाणारा डान्स असून, त्यात फक्त हातांचा वापर होतो आणि कोणत्याही प्रॉप्सची गरज लागत नाही. त्यामुळे हा डान्स स्वतंत्रपणे करता येतो. दुसरीकडे, राससाठी दांडिया आणि पार्टनर आवश्यक असतो, त्यामुळे त्यात समन्वय अधिक महत्त्वाचा ठरतो."

advertisement

मुंबईत सुरू आहे अफलातून एक्झिबिशन, सणासुदीच्या खरेदीसाठी उत्तम ठिकाण

वर्कशॉपमध्ये त्यांनी गरब्याच्या काही सोप्या स्टेप्स शिकवल्या ज्या नवशिक्यांसाठी उपयुक्त ठरल्या. या स्टेप्समध्ये:

  • एक टाळी: सुरुवातीची आणि सोपी स्टेप, जिच्यात एका टाळीवर हालचाल होते.
  • दोन टाळी: अधिक तालबद्ध आणि लोकप्रिय गरबा स्टेप.
  • advertisement

  • तीन टाळी: गरब्याची पारंपरिक शैली, ज्यात ताल आणि चाल दोन्ही महत्वाचे.
  • डाकला: पारंपरिक गुजराती स्टेप, गती आणि ताल यांचा समतोल साधतो.
  • गलगोटो: वेगवान हालचाली आणि फिरकी असलेली सर्जनशील स्टेप.

या वर्कशॉपमुळे सहभागी विद्यार्थ्यांना गरब्याची मूलतत्त्वे आणि तालबद्धता आत्मसात करता आली. गौरी नार्वेकर यांचा हा उपक्रम कळव्यातील सांस्कृतिक आणि नृत्य प्रेमींसाठी नक्कीच एक प्रेरणादायी पाऊल ठरला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवरात्री गरबा-दांडियामध्ये करा सोप्या आणि खास स्टेप्स; कोरिओग्राफर गौरी नार्वेकर यांच्याकडून शिका हटक्या स्टेप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल