नवरात्रनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल, बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण देशामध्ये, शारदीय नवरात्रला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजी नगर शहराचे ग्रामदैवत कर्णपुरा देवी आहे. नवरात्र मध्ये नऊ दिवस या ठिकाणी मोठी अशी यात्रा भरते.
छत्रपती संभाजीनगर : येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण देशामध्ये, शारदीय नवरात्रला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजी नगर शहराचे ग्रामदैवत कर्णपुरा देवी आहे. नवरात्र मध्ये नऊ दिवस या ठिकाणी मोठी अशी यात्रा भरते. आणि मराठवाड्यातून तसेच जिल्ह्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. यात्रेनिमित्त वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत हे वाहतुकीमध्ये बदल असणार आहे. अशा सूचना वाहतूक शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक सचिन मिरगे यांनी चारी केल्या आहेत.
22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हे मार्ग वाहनांसाठी बंद राहतील
लोखंडी पूल ते पंचवटी चौक जाणारा व येणारा मार्ग. कोकणवाडी चौक ते पंचवटी चौकाकडे जाणारा व येणारा मार्ग. महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) ते पंचवटी चौक उड्डाणपुलाखालील जाणारा व येणारा मार्ग, रेल्वे स्टेशनकडून पंचवटी चौकाकडे पुलाखालून जाणारा मार्ग बंद असेल.
advertisement
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
- रेल्वे स्टेशनकडून मध्यवर्ती बसस्थानक, छावणी, पडेगावकडे जाणारी सर्व वाहने ही महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) वरील उड्डाणपुलाचा वापर करतील.
- नाशिक, धुळ्याकडून येणारी व जालना, बीडकडे जाणारी वाहने शरणापूर फाटा, एएस क्लब लिंक रोड-महानुभव आश्रम चौक, बीड बायपास या मार्ग वापरतील.
- नाशिक, धुळ्याकडून पैठणकडे जाणारी वाहने साजापूर फाटा, लिंक रोडमार्गे किंवा नवीन धुळे-सोलापूर हायवेने जातील.
- पुणे-अहिल्यानगरकडून येणारी व जालना, बीडकडे जाणारी वाहने एएस क्लब, लिंक रोड, महानुभाव आश्रम चौक, बीड बायपास रोडचा वापर करतील.
- जालना, बीडकडून अहिल्यानगर-धुळे-नाशिककडे जाणारी वाहने केंब्रिज नाका, झाल्टा फाटा, बीड बायपास रोड, महानुभाव आश्रम, लिंक रोड, एएस क्लबमार्गे जातील कोकणवाडी चौकाकडून पंचवटी चौकाकडे येणारी वाहने रेल्वे स्टेशन किंवा क्रांती चौकमार्गे जातील.
advertisement
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 20, 2025 5:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवरात्रनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल, बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग कोणते?