मुंबईत सुरू आहे अफलातून एक्झिबिशन, सणासुदीच्या खरेदीसाठी उत्तम ठिकाण
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
सणासुदीच्या निमित्ताने दादरमधील सूर्यवंशी हॉलमध्ये घे भरारी एक्सहिबिशन आयोजित करण्यात आले आहे जिथे 100+ स्टॉल्सवर विविध आकर्षक वस्तू पाहायला मिळतील. हे प्रदर्शन गिनीज रेकॉर्ड होल्ड असून एक अनोखा अनुभव देणार आहे.
सणासुदीच्या निमित्ताने दादरमधील सूर्यवंशी हॉलमध्ये घे भरारी एक्सहिबिशन आयोजित करण्यात आले आहे जिथे 100+ स्टॉल्सवर विविध आकर्षक वस्तू पाहायला मिळतील. हे प्रदर्शन गिनीज रेकॉर्ड होल्ड असून एक अनोखा अनुभव देणार आहे. इथे स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सर्वांसाठी काहीतरी खास उपलब्ध आहे ज्यामध्ये हस्तकला वस्त्र, फॅशन अॅक्सेसरीज, गृहसजावटीच्या वस्तू, भेटवस्तू आणि खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे.
या प्रदर्शनात पारंपरिक भारतीय संस्कृतीला आधुनिकतेचा स्पर्श देणारी उत्पादने असलेली विविध वस्त्रे आणि वस्तू आहेत. महिलांसाठी खास साड्यांची आकर्षक रेंज या ठिकाणी पाहायला मिळते. इरकल, कांजीवरम, कोटन, ब्लॉक प्रिंट, डोला सिल्क आणि पैठणी अशा विविध प्रकारच्या साड्यांचा संग्रह ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या साड्यांची किंमत 1000 रुपयांपासून सुरू होऊन 5000 रुपयांपर्यंत आहे.
advertisement
त्याचबरोबर AD ज्वेलरीचा एक आकर्षक कलेक्शनही उपलब्ध आहे ज्याची किंमत 200 ते 1500 पर्यंत आहे. ड्रेस मटेरियलच्या विविध पर्यायांची किंमत 750 पासून सुरू होऊन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत. पुरुषांसाठी कापडांच्या रेंजची किंमत 800 पासून सुरू होते तर होम डेकोर वस्त्रांची किंमत 200 पासून उपलब्ध आहे जी घराच्या सजावटीसाठी आदर्श ठरतील.
advertisement
खवय्यांसाठी खास दिवाळी फराळ, विविध प्रकारचे पेय आणि अनेक स्वादिष्ट खाद्यपदार्थ देखील या प्रदर्शनीत उपलब्ध आहेत. हे खाद्यपदार्थ ग्राहकांना आकर्षित करत आहेत आणि सणाच्या आनंदात भर घालतात.
घे भरारी एक्सहिबिशन हे एक उत्तम ठिकाण आहे जिथे सणाच्या सुमारास विविध प्रकारचे पारंपारिक आणि आधुनिक उत्पादने एका छताखाली मिळतील. या प्रदर्शनात जाऊन तुमच्या सणासुदीच्या खरेदीला एक वेगळं आकर्षण देणं विसरू नका.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 4:43 PM IST