TRENDING:

Ratnagiri Local Body Election: कोकणात मोठी घडामोड, राणेंच्या निकटर्तीयाची भाजपला सोडचिठ्ठी, चिपळूणच्या राजकारणात उलटफेर

Last Updated:

Chiplun Election : स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच चिपळूणमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोकणात मोठी घडामोड, राणेंच्या निकटर्तीयाची भाजपला सोडचिठ्ठी, चिपळूणच्या राजकारणात उलटफेर
कोकणात मोठी घडामोड, राणेंच्या निकटर्तीयाची भाजपला सोडचिठ्ठी, चिपळूणच्या राजकारणात उलटफेर
advertisement

राजेश जाधव, प्रतिनिधी, चिपळूण-रत्नागिरी: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच चिपळूणमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

advertisement

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह जिल्हा उपाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या अचानक घडलेल्या घडामोडीमुळे चिपळूणच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भोसले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षत्याग केला असून, त्यांच्या या सामूहिक निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक संघटनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर नेमका हा धक्का बसल्याने पक्षाच्या रणनीतीवर थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

advertisement

परिमल भोसले हे पक्षातील सक्रिय, संघटनेशी जोडलेले आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने भाजपच्या अंतर्गत समीकरणांवर आणि निवडणूक गणितावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिमल भोसले हे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या कुटुंबीयांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते.

advertisement

भोसले लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय अधिकृतरित्या जाहीर करणार आहेत. राजीनाम्यामागील कारणे, पक्षावरील नाराजी आणि त्यांची पुढील राजकीय दिशा याबद्दल ते माहिती देणार असल्याची माहिती समोर आली आहे. परिमल भोसले हे शिवसेनेच्या ठाकरे गट किंवा शिंदे गटात प्रवेश करणार की वेगळाच निर्णय घेणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

advertisement

भाजप नगरसेविकेचा राजीनामा...

नगरसेविका नुपूर बाचीम यांनी देखील तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्षाने माझ्यावर अन्याय केला आहे मी नगरसेविका असून सुद्धा मला वगळून दुसऱ्या उमेदवाराला तिकिट दिल्याने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले. नुपुर बाचीम आता अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत.

दरम्यान, या राजकीय घडामोडींमुळे चिपळूण भाजपमध्ये हलचल वाढली असून, स्थानिक पातळीवर चर्चा आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. नगरपरिषद निवडणूक जवळ येत असताना भाजपला बसलेला हा धक्का पुढील समीकरणात काय बदल घडवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दागिने नाही तर... पुणेकर या लाख मोलाच्या वस्तू मोफत पाहता येणार, कधी आणि कुठं?
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ratnagiri Local Body Election: कोकणात मोठी घडामोड, राणेंच्या निकटर्तीयाची भाजपला सोडचिठ्ठी, चिपळूणच्या राजकारणात उलटफेर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल