इंडिया आघाडीवर घणाघात
'इंडी आघाडीने नेहमी देशाला अस्थिरतेमध्ये ढकललं आहे. एक स्थिर सरकार का असावं हे महाराष्ट्रापेक्षा जास्त कुणी सांगू शकत नाही. इंडिया आघाडी सरकार जेव्हा जेव्हा आलां तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे. जेव्हा इंडिया आघाडीचे लोक षडयंत्र करून सरकारं आणली पण त्यांनी स्वत: चाच विकास केला, घराण्याचा विकास केला. कंत्राट कुणाला मिळालं पाहिजे, कसं मिळालं पाहिजे, यासाठी त्यांनी काम केलं', अशी टीका पंतप्रधानांनी केली.
advertisement
'महाराष्ट्रात कोणताही प्रकल्प आला तर कमिशन द्या नाहीतर काम थांबवतो, असंच काम केलं आहे. या महाविकास आघाडीने जलयुक्त शिवार योजना थांबवली. समृद्धी महामार्गाला सुद्धा विरोधकांनी विरोध केला होता. मुंबईत मेट्रोचं काम थांबवलं होतं. पीएम आवास योजनेतून पैसे येऊन सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू दिले नाही. महाराष्ट्रात कोणताही प्रकल्प आला तर कमिशन द्या नाहीतर काम थांबवतो, असंच काम केलं आहे. या महाविकास आघाडीने जलयुक्त शिवार योजना थांबवली. समृद्धी महामार्गाला सुद्धा विरोधकांनी विरोध केला होता. मुंबईत मेट्रोचं काम थांबवलं होतं. पीएम आवास योजनेतून पैसे येऊन सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू दिले नाही', असा आरोप मोदींनी केला.