शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांची बैठक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीआधी ही बैठक पार पडणार आहे. . बैठकीला कॉंग्रेसकडून अतुल लोंढे, मनसेकडून बाळा नांदगावकर, तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून अनिल देसाई आणि अरविंद सावंत उपस्थित आहेत. या बैठकीत राज्यातील राजकीय स्थिती, निवडणूक आयोगासमोर ठेवायच्या मुद्द्यांवर आणि निवडणूक प्रक्रियेसंदर्भात धोरणात्मक चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळात ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजीव कुमार झा, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, मनसेचे नेते बाळा नांदगावकर आदी सहभागी असणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील आठवड्यात, शनिवारी मतदारयादीच्या घोळाविरोधात विरोधी पक्षाने मोर्चा काढला होता. मतदान यंत्रातील घोळ आणि दुबार मतदारांच्या प्रश्नावर सत्याचा मोर्चात निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आणि खासदार अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ताटकळत ठेवण्यात आले.
