रायगड जिल्ह्यातल्या महाड नगरपालिकेची निवडणूक यंदा रंगतदार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मंत्री भरत गोगावले यांचा बालेकिल्ला असणारी ही नगरपालिका गेली कित्येक वर्ष जगताप कुटुंबाकडे राहिल्याने गोगावले यांना कायम नगराध्यक्ष पदाला मुकावे लागलं होते. मात्र यंदा गोगावले यांनी चांगलाच जोर लावला होता. अजित दादांची राष्ट्रवादी आणि भाजप युतीकडून सुदेश कळमकर रिंगणात उतरले असून शिंदे सेनेकडून नगरसेवक पदाचा दांडगा अनुभव असलेले सुनील कविस्कर नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत.तर तिकडे या दोघांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून नगरसेवक राहिलेले चेतन पोटफोडे सुद्धा नगराध्यक्षपदासाठी उभे होते.
advertisement
विजयानंतर महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नगर परिषद निवडणुकीच्या आधी स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर महाडमधील राजकारण चांगलंच तापलं होतं.
भरत गोगावलेंचा तटकरेंना टोला...
रायगड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीचा निकाल हाती येताच मंत्री भरत गोगावले यांनी आम्ही हा चमत्कार केल्याचे म्हटले. दुसऱ्याच्या भांड्यात डोकवण्यापेक्षा स्वतःच भांड स्वच्छ ठेवा असा टोला त्यांनी सुनील तटकरे यांना लगावला आहे. हा बदल होणे गरजेचे होते. आम्ही शिवाजी महाराज यांच्यासारखे युक्तीने ही जागा जिंकलो असल्याचे त्यांनी म्हटले.
