TRENDING:

PM Modi Speech Highlights: महाविकास आघाडीवर निशाणा ते कलम 370 वरून काँग्रेसला घेरलं, पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

Last Updated:
impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चंद्रपूर :  महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi)  काळात अनेक विकासकामांना ब्रेक लागला आहे. महाराष्ट्राचा विकास हा महाविकासआघाडीला कधीही न जमाणारा आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाविकासआघाडीवर (PM Modi Speech In Chimur)  निशाणा साधला आहे. तसेच कलम 370 ला काँग्रेस जबाबदार आहे. कलम 370 रद्द करण्यासाठी काँग्रेसने विरोध केला. सात दशकाहून अधिक काळ जम्मू काश्मीरला संविधानापासून वंचित ठेवलं, असे देखील मोदी म्हणाले. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिमूर येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. जाणून घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतीव महत्त्वाचे मुद्दे...
PM Modi
PM Modi
advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात निवडणुकीचे काय निकाल काय येणार हे आजच्या गर्दीने दाखवून दिले. ही गर्दी बहुमताचे प्रतीक आहे. राज्यात युती सरकार आहे तर गती आहे, ही महाराष्ट्राची प्रगती आहे. - केंद्रात NDA राज्यात महायुती म्हणजे विकासाचा डबल वेग झाला आहे. गेल्या अडीच वर्षात जनतेने विकासाचा डबल वेग पहिला आहे. नवे एक्सप्रेस वे बनत आहेत, महाराष्ट्रामध्ये एक डझन वंदे भारत रेल्वे धावत आहे. नव्या रेल्वे मार्गाचा विस्तार होत आहे.

advertisement

महाविकासआघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे मोठे खिलाडी: पंतप्रधान मोदी

आमच्या कामाची स्पीड मविआ कशी रोखते हे चंद्रपूरच्या जनतेपेक्षा कोणाला माहिती आहे. आमच्या सरकारने खापा वरोरा रेल्वे लाईनला मंजुरी दिली. नागपूर गडचिरोली रेल्वे लाईन लवकरच पूर्ण होणार आहे. जनतेला सुविधा मिळेल वेळ पैशाची बचत होईल. महाराष्ट्र विकास हा आघाडीला हे न जमणारे आहे. महाविकास आघाडीने फक्त विकासाला ब्रेक लावण्यात PHD केली. काम अडकवण्यात त्यांनी पीएचडी केली आहे. - समृद्धी ते मेट्रो रोखण्याचे काम आघाडीने केले. आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे मोठे खिलाडी आहेत. यांना पुन्हा लुटण्याचे लायसन्स मिळू देणार का? महाराष्ट्र प्रगतीवर ब्रेक लागू देऊ नका, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

advertisement

सात दशकाहून अधिक काळ जम्मू काश्मिरला संविधानापासून वंचित ठेवलं : पंतप्रधान मोदी

महाराष्ट्राचे अनेक जवान जम्मू काश्मिरात धारातीर्थी पडले. कलम 370 ला काँग्रेस जबाबदार आहे. कलम 370 रद्द करण्यासाठीकाँग्रेसने विरोध केला. सात दशकाहून अधिक काळ जम्मू काश्मिरला संविधानापासून वंचित ठेवलं . 70 वर्ष काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान लागू नव्हतं.मोदी सत्तेत येई पर्यंत देशात दोन संविधान चालत होते, असे म्हणत मोदीनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

advertisement

आमच्या सरकारने नक्षलवादावर लगाम लावला : पंतप्रधान मोदी

चंद्रपूरने दशकभर नक्षलवाद सहन केला. आमच्या सरकारने नक्षलवादावर लगाम लावला. गडचिरोली, चिमूरमध्ये नवीन संधी निर्माण केल्या जात आहे. मी गरिबांच्या अडचणी समजतो तुमचं जीवन सुखकर होईल यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतो.  एकट्या चिमूरमध्ये 16 लाख परिवाराला मोफत राशन मिळत आहे. वंचित समाजाला योजनांचा लाभ मिळत आहे. गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर निघाले. महाराष्ट्र समृद्ध, शेतकरी समृद्ध करायला काम करायचं आहे, असेही मोदी म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PM Modi Speech Highlights: महाविकास आघाडीवर निशाणा ते कलम 370 वरून काँग्रेसला घेरलं, पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल