केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही बॅगची निवडणूक विभागाच्या पथकाने तपासणी केल्याची माहिती समोर आलीय. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री गडकरी हे आज हेलिकॉप्टरने किल्लारी येथे आले असता त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आलीय. नितीन गडकरी ही भाजपचे स्टार प्रचारक आहेत.
निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीचा प्रचार करताना हेलिकॉप्टर आणि विमान चेक करण्याची एसओपी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे देखील हेलिकॉप्टर चेक करण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीदरम्यान हेलिकॉप्टर चेक करण्यात येईल अशा प्रकारची एसओपी आहे असे स्पष्ट केले होते.
advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही झाले होते आरोप
प्रचारावेळी नेत्यांच्या हेलिकॉप्टरमधून सर्रास बॅगा उतरत असतात. काही वर्षांपूर्वी एका मंत्र्याच्या मंत्री हेलिकॉप्टरमधून बॅगा उतरविण्यात आल्या होत्या. यावेळी विरोधकांनी त्यांच्या बॅगा तपासण्याची मागणी केली होती. परंतु, बॅगांची तपासणी न झाल्याने राजकीय आरोप झाले होते. तसेच लोकसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बॅगा उतरविल्या होत्या. यावेळी देखील शिवसेना ठाकरे गटाने शिंदेंनी कोट्यवधी रुपये बॅगेतून नेल्याचा आरोप केला होता.
