TRENDING:

Maharashtra Assembly Election Results 2024: काँग्रेसची बंडखोरी यशस्वी ठरणार की शिवसेना गड राखणार?

Last Updated:

Maharashtra Assembly Election Results 2024: राजापूर, रत्नागिरी, गुहागर आणि दापोली या चार मतदारसंघात शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना असे उमेदवार रिंगणात आहेत, तर चिपळूण मतदारसंघात दोन राष्ट्रवादी आमनेसामने आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात 38 उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यात तब्बल 22 उमेदवार अपक्ष होते. जिल्ह्यातील रत्नागिगरी, चिपळूण, गुहागर आणि दापोली या चार मतदारसंघात दोन प्रमुख उमेदवारांमध्ये थेट लढत होईल, असे चित्र होते. केवळ राजापूर मतदारसंघात काँग्रेसकडून बंडखोरी झाली असल्याने तेथील लढत तिरंगी झाली.
News18
News18
advertisement

राजापूर, रत्नागिरी, गुहागर आणि दापोली या चार मतदारसंघात शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना असे उमेदवार रिंगणात आहेत, तर चिपळूण मतदारसंघात दोन राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. मंत्री उदय सामंत, राजापूरचे उमेदवार किरण सामंत यांनी पाली येथे पहिल्या टप्प्यातच मतदान करुन मतदारसंघाचा दौरा सुरू करुन आढावा घेण्यास सुरुवात केली आह. मंत्री उदय सामंत यांनी प्रथम रत्नागिरी शहरातील अनेक बूथना भेट दिली आणि त्यानंतर ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला.

advertisement

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उदय सामंत यांनी 1,18,484 मते मिळवून विजय मिळवला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (एनसीपी) सुदेश सदानंद मयेकर यांना 31,149 मते प्राप्त झाली होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

रत्नागिरी (5) दापोली योगेश कदम (शिवसेना) संजय कदम (उ.बा.ठा.) संतोष अबगुल
गुहागर राजेश बेंडल (शिवसेना) भास्कर जाधव (उ.बा.ठा.) प्रमोद गांधी
चिपळूण शेखर निकम (राष्ट्रवादी) प्रशांत यादव (पवार राष्ट्रवादी)
रत्नागिरी उदय सामंत (शिवसेना) सुरेंद्रनाथ (बाळ) माने (उ.बा.ठा.)
राजापूर किरण सामंत (शिवसेना) राजन साळवी (उ.बा.ठा.)

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Assembly Election Results 2024: काँग्रेसची बंडखोरी यशस्वी ठरणार की शिवसेना गड राखणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल