TRENDING:

Maha Vikas Aghadi : अपक्ष, लहान पक्षांनी चुकवले मविआचे गणित, 64 मतदारसंघात बसला फटका

Last Updated:

Mahavikas Aghadi : विधानसभा निवडणुकीत झालेली बंडखोरी, अपक्ष, लहान घटक पक्षांमुळे महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सगळ्यांनाच धक्का दिला. महायुतीने प्रचंड बहुमत मिळवत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. सत्तेत येण्यासाठी महाविकास आघाडीने केलेली सगळीच समीकरणं चुकली. विधानसभा निवडणुकीत झालेली बंडखोरी, अपक्ष, लहान घटक पक्षांमुळे महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला. या घटकांमुळेच महाविकास आघाडीला 64 जागांवर फटका बसला. सगळ्यात मोठा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला.
अपक्ष, लहान पक्षांनी चुकवले मविआचे गणित, 64 मतदारसंघात बसला फटका
अपक्ष, लहान पक्षांनी चुकवले मविआचे गणित, 64 मतदारसंघात बसला फटका
advertisement

राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांत विविध पक्षांमध्ये बंडखोरी झाली. काही बंडखोरांनी दुसऱ्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. तर, काहींनी अधिकृत उमेदवाराविरोधातच बंडाचे निशाण फडकवले. तर, इतर लहान घटक पक्षांच्या उमेदवारांचाही फटका महाविकास आघाडीला बसला. शरद पवारांना 23 जागांवर नुकसान सहन करावे लागले. यातील 8 जागा या त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र या बालेकिल्ल्यातील आहेत.

advertisement

काँग्रेसला एकूण 22 जागांवर हा फटका बसला. यात विदर्भातील 9 मतदारसंघांचा समावेश आहे. मराठवाड्यात 6 जागांवर फटका बसला. विदर्भात काँग्रेसची कामगिरी सर्वोत्तम होईल, अंदाज वर्तवण्यात येत होता. पण, काँग्रेसच्या पदरी अपयश आले. विदर्भ-मराठवाड्यातील 15 जागांवर काँग्रेसला अपक्ष, बंडखोर, लहान पक्षांचा फटका बसला.

शिवसेना ठाकरे गटाला 18 जागांवर फटका सहन करावा लागला. मुंबई आणि मुंबई महानगर भागात 5 जागांवर लहान घटक पक्ष, अपक्षांनी घेतलेल्या मतांमुळे ठाकरे गटाला पराभवाचा फटका सहन करावा लागला.

advertisement

कोणत्या पक्षाला कोणत्या जागांवर फटका?

शिवसेना ठाकरे गटाने गमावलेल्या जागा : 1) अकोला पूर्व 2) संभाजीनगर मध्य 3) भांडुप पश्चिम 4) बोईसर 5) गंगाखेड 6) घाटकोपर पश्चिम 7) कल्याण पूर्व 8) कल्याण ग्रामीण 9) कन्नड 10) कर्जत 11) लोहा 12) नेवासा 13) पाचोरा 14) परतूर 15) सांगोले 16) श्रीगोंदा 17) उरण 18) बुलढाणा

advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने गमावलेल्या जागा : 1) अहेरी 2) अहमदपूर 3) अकोले 4) आंबेगाव 5) अणुशक्तीनगर 6) वसमत 7) बेलापूर 8) भिवंडी 9) चंदगड 10) गंगापूर 11) घनसावंगी 12) हडपसर 13) इंदापूर 14) जितूर 15) जुन्नर 16) केज 17) माजलगाव 18) मूर्तिजापूर 19) परांडा 20) पारनेर 21) शहापूर 22) शेवगाव 23) सिंदखेड राजा

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

काँग्रेसने गमावलेल्या जागा : 1) अचलपूर 2) अक्कलकुवा 3) आकोट 4) अमरावती 5) संभाजीनगर पूर्व 6) भोर 7) करवीर 8 ) खामगाव 9) लातूर ग्रामीण 10) मुखेड 11) नागपूर मध्य 12) नांडे उत्तर १३) नांदेड दक्षिण 14) पंढरपूर (मैत्रीपूर्ण लढत) 15) पाथरी 16) पुरंदर (शिंदे व अजित मैत्रीपूर्ण लढत) 17) राजूरा 18) राळेगाव 19) साक्री 20) वसई 21) वर्धा 22) वरोरा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maha Vikas Aghadi : अपक्ष, लहान पक्षांनी चुकवले मविआचे गणित, 64 मतदारसंघात बसला फटका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल