सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोनच दिवसांत 25 नोव्हेंबर रोजी महायुतीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभेत महायुतीचा नेता ठरवला जाणार आहे. याचाच अर्थ याच बैठकीत महायुतीच्या मुख्यमंत्रीपदी कोण असणार, यावर या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. महायुतीकडून 25 नोव्हेंबर रोजी सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. तर, 26 नोव्हेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
भाजपचा मुख्यमंत्री होणार...
राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत महायुतीने दमदार कामगिरी केली आहे. सुरुवातीच्या कलात महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. महायुतीमधील भाजपने 100 हून जागा मिळवल्या आहेत. भाजप 2014 मधील सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. भाजप 122 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. हा कल कायम राहिल्यास भाजपचा मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे.
फडणवीसांचे नाव आघाडीवर....
भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच वक्तव्य केले आहे. प्रविण दरेकर यांनी म्हटले, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असावे, अशी आमची इच्छा आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत घटक पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचे याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आहे. त्यामुळे पुढील मुख्यमंत्री हा भाजपचा असणार असल्याचे संकेत आहेत. महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा लढवल्या आणि तीन आकडी जागांवर विजय मिळवताना दिसत आहे.
