मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या लाभार्थ्यांना दीड हजार रूपये अर्थसहाय्य दिले जात होते. आता ते अडीच हजार रुपये दिले जाईल. या निर्णयाचा लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, निराधार विधवा आदींना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिले जाते. सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ४ लाख ५० हजार ७०० आणि श्रावणबाळ योजनेत २४ हजार ३ दिव्यांग लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना आता दरमहा अडीच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यास आज मान्यता देण्यात आली. हे अनुदान ऑक्टोबर २०२५ पासून देण्यात येईल. यासाठी आवश्यक ५७० कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.
advertisement
श्रावणबाळ योजना
राज्यातील निराधार आणि गरजू वृद्ध व्यक्तींना श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे आहे. पात्र वृद्ध व्यक्तींना दरमहा ठराविक रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते.
संजय गांधी निराधार अनुदान योजना
संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्रातील निराधार, वृद्ध, अपंग, अनाथ, तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती, विधवा, घटस्फोटित महिलांना आर्थिक मदत देणारी राज्य सरकारची योजना आहे. या योजनेत पात्र लाभार्थींना प्रतिमाह आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील निराधार, अपंग, वृद्ध, अनाथ, दुर्धर आजारांनी ग्रस्त व्यक्तींना आर्थिक साहाय्य देणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.