TRENDING:

Maharashtra Cabinet Expansion : शिवसेना, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे भाजप श्रेष्ठींकडे, कोणाला संधी, पाहा यादी

Last Updated:

Maharashtra Cabinet Expansion : शिवसेना शिंदे गटाकडून 10 जणांची नावे सादर करण्यात आली असून तर राष्ट्रवादीकडून 6 जणांची नावे पाठवण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी, नवी दिल्ली : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटणार असल्याची चर्चा सुरू असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे. महायुतीमध्ये सत्ता वाटपावर चर्चा सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातील संभाव्य मंत्र्यांच्या यादी भाजप श्रेष्ठींकडे पोहचली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 10 जणांची नावे सादर करण्यात आली असून तर राष्ट्रवादीकडून 6 जणांची नावे पाठवण्यात आली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी भाजप  श्रेष्ठींकडे, कोणाला संधी, कोणाचा पत्ता कट?
शिवसेना, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी भाजप श्रेष्ठींकडे, कोणाला संधी, कोणाचा पत्ता कट?
advertisement

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावे दिल्लीत पोहचली आहेत. ही नावे भाजपच्या ⁠केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी पाठवण्यात आली आहे. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा 14 डिसेंबर रोजीा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र, सरकार स्थापन होण्यास जवळपास 13 दिवसांचा कालावधी लागला. सत्ता वाटपाच्या मुद्यावरून शपथविधीला उशीर झाला असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचाच शपथविधी झाला आहे.

advertisement

विधानसभेचे विशेष अधिवेशन संपल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात खलबतंदेखील झाली. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या चर्चांनी जोर धरला होता.

कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट?

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही आमदारांची नावे संभाव्य मंत्री म्हणून भाजपकडे पाठवण्यात आली आहे. भाजपने या यादीला मंजुरी दिल्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

advertisement

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. ⁠भाजपच्या मंत्र्यांच्या नावावर मात्र पक्षाच्या संसदीय बोर्डमध्ये चर्चा करून ⁠संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ⁠भाजपच्या नेत्यांनी त्यांची संभाव्य मंत्र्यांची यादी संसदीय बोर्डासमोर सादर केल्याचीही माहिती आहे. 14 डिसेंबर रोजी काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची, तर काहींच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडणार आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे

advertisement

>> शिवसेना शिंदे गट संभाव्य मंत्री

1. उदय सामंत

2. ⁠तानाजी सावंत

3. ⁠शंभूराजे देसाई

4. ⁠दादा भुसे

5. ⁠गुलाबराव पाटील

6. ⁠राजेश क्षीरसागर

7. हेमंत पाटील

8. ⁠प्रताप सरनाईक

9. ⁠संजय शिरसाट

10. ⁠भरत गोगावले

>> राष्ट्रवादी संभाव्य मंत्री

1. आदिती तटकरे

2. ⁠हसन मुश्रीफ

3. ⁠छगन भुजबळ

4. ⁠धनंजय मुंडे

advertisement

5. ⁠धर्मरावबाबा अत्राम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

6. ⁠अनिल पाटील

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Cabinet Expansion : शिवसेना, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे भाजप श्रेष्ठींकडे, कोणाला संधी, पाहा यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल