TRENDING:

Maharashtra News: तुमच्या जिल्ह्याला किती निधी मिळाला? फक्त ३ जिल्ह्यांनाच १००० कोटी मंजूर, पाहा संपूर्ण यादी...

Last Updated:

Maharashtra Budget for District Devlopment : पुणे जिल्ह्याला एकूण आकड्यात सर्वाधिक निधी मिळाला असला, तरी गेल्या तीन वर्षांतील वाढीचा कल पाहता नागपूरने आघाडी घेतली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात जिल्हा वार्षिक योजनेसाठी २१ हजार ८६७ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली असून, यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्याला निधी वाढीच्या बाबतीत झुकते माप मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्याला एकूण आकड्यात सर्वाधिक निधी मिळाला असला, तरी गेल्या तीन वर्षांतील वाढीचा कल पाहता नागपूरने आघाडी घेतली आहे.
तुमच्या जिल्ह्याला किती निधी मिळाला? फक्त ३ जिल्ह्यांनाच १००० कोटी मंजूर, पाहा संपूर्ण यादी...
तुमच्या जिल्ह्याला किती निधी मिळाला? फक्त ३ जिल्ह्यांनाच १००० कोटी मंजूर, पाहा संपूर्ण यादी...
advertisement

निधीवाटपाचे गणित

पुढील आर्थिक वर्षासाठी राज्याच्या नियोजन विभागाने गेल्या वर्षाच्या तुलनेत १,७०२ कोटींची वाढ केली आहे. पुणे, नागपूर आणि मुंबई उपनगर या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी १,००० कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यासाठी १३०० कोटींची तरतूद असूनही, गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ केवळ ६६ कोटींची आहे. याउलट, नागपूरसाठी १०२१.९० कोटींची तरतूद करण्यात आली असून, ही वाढ तब्बल १३७ कोटींची असल्याचे वृत्त दैनिक लोकसत्ताने दिले आहे.

advertisement

तीन वर्षांचा तुलनात्मक आढावा

२०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षांच्या कालखंडाचा विचार केल्यास राजकीय प्राधान्य स्पष्टपणे दिसून येते. या काळात नागपूर जिल्ह्याच्या निधीत एकूण ३३८ कोटींची भर पडली आहे, तर पुणे जिल्ह्याच्या निधीत २३१ कोटींची वाढ झाली आहे.

निधी वाटपाचा निकष काय?

विशिष्ट जिल्ह्यांना अधिक निधी मिळण्यावरून चर्चा सुरू असली, तरी नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ आणि आदिवासी भाग यांसारख्या तांत्रिक निकषांच्या आधारावरच हे सूत्र निश्चित केले जाते, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे. तरीही, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याला मिळालेली भरीव वाढ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशक्य काहीच नाही! लहानपणी क्रिकेटची आवड, तिनं लग्नानंतर केलं असं, घरात 100 ट्रॉफ
सर्व पहा

जिल्हा नवीन तरतूद (कोटी) चालू आर्थिक वर्षातील निधी
मुंबई शहर ५५५ ५२८
मुंबई उपनगर ११०५ १०६६
ठाणे ८६० ८१५
रायगड ५१७ ४८१
रत्नागिरी ४३९ ४०६
सिंधुदुर्ग ३०७ २८२
पुणे १३०० १२३४
सातारा ५८२ ५४०
सांगली ४५७ ४३६
सोलापूर ६९८ ६४०
कोल्हापूर ५५० ५२३
नाशिक ८१७ ७२४
धुळे २९० २७१
जळगाव ६२७ ५७८
अहिल्यानगर ७६१ ६८३
नंदुरबार १८८ १७६
छत्रपती संभाजीनगर ६०२ ५५६
जालना ३९८ ३७६
परभणी ३३२ २९८
नांदेड ५१४ ४९१
बीड ५३६ ४८३
लातूर ४०५ ३८६
धाराशिव ४०५ ३७८
हिंगोली २६७ २४६
नागपूर १०२१ ८८४
वर्धा ३४३ २९३
भंडारा २५० २३३
चंद्रपूर ४३० ३९०
गडचिरोली ३९० ३४१
गोंदिया २६० २४५
अमरावती ६०५ ५२७
अकोला २६३ २२५
यवतमाळ ४५२ ४११
बुलढाणा ४१४ ३७८
वाशिम २८३ २६०
पालघर ३२२ २९६

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra News: तुमच्या जिल्ह्याला किती निधी मिळाला? फक्त ३ जिल्ह्यांनाच १००० कोटी मंजूर, पाहा संपूर्ण यादी...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल