अजित पवार हे सोमवारी सायंकाळपासून दिल्लीत आहेत. अजित पवार यांचा हा दिल्ली दौरा खासगी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये दीड तास मंत्रिमंडळावरती खलबतं झाल्याची माहिती समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुती सरकारमध्ये मिळणाऱ्या खात्यांच्या मंत्र्यांच्या नावाबाबत दीड तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
अर्थ मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम खाते, कृषी मंत्रालय आदी मंत्रालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. जवळपास सात मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमित शाहांच्या भेटीसाठी वेट अॅण्ड वॉच...
अमित शाह यांच्या भेटीसाठी अजित पवार यांनी वेट ॲंड वॉचची भूमिका घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमित शाह हे चंदीगढ इथे शासकीय कार्यक्रमात व्यस्त असल्यानं अजित पवार यांनीा वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. अमित शाह हे दिल्लीत आल्यावर भेट होण्याची शक्यता आहे.
शाह यांची जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत अजित पवार दिल्लीत थांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही खात्यांवर असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी अजित पवार रात्रीपासून दिल्लीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आज मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांची होणारी बैठक अनिश्चित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी काय?
विधानसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट जास्त असल्याने मंत्रिमंडळात अधिक जागा देण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. हीच मागणी करण्यासाठी अजित पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. जागा वाटपात जास्त घासाघीस न करता कमी जागा लढवून जास्त जागा जिंकल्या तेंव्हा राष्ट्रवादीला मंत्री पदात जास्त जागा मिळाल्या पाहीजे असा सूर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लावला आहे.
