महायुतीची दोन दिवसात बैठक...
शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले की, काल दिल्लीत ही बैठक अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. ही बैठक सकारात्मक झाली. महाराष्ट्राच्या विकासाच्या अनुषंगाने ही सकारात्मक बैठक झाली. राज्याचे काळजीवाहू एकनाथ शिंदे यांचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आज महायुतीची बैठक होती. मात्र, भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर ही बैठक 2 दिवसात होईल अशी माहितीदेखील शेवाळे यांनी दिली.
advertisement
राहुल शेवाळे यांनी म्हटले की, विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली आणि त्याला यश आलं. त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीचे ते यश आहे. महायुतीची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली होती. यात एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. महायुतीच्या बैठकी पूर्वी एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची वैयक्तिक स्वतंत्र बैठक झाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्या काही भावना आहेत. प्रस्ताव आहेत त्या मांडल्या. आता, त्याचा आदर ठेवून निर्णय घेतला जाईल असे शेवाळे यांनी सांगितले.
निवडणूक पूर्वीच्या चर्चांची जाणीव करुन दिली...
राहुल शेवाळे यांनी म्हटले की, निवडणूकीपूर्वी ज्या काही चर्चा झाल्या होत्या. त्या चर्चांची जाणीव भाजपच्या नेत्यांना करून दिली. या पूर्वीही शिवसेनेने एनडीएचा घटक पक्ष म्हणून सहकार्याची भूमिका ठेवली आहे. या सर्व गोष्टींची जाणीव एकनाथ शिंदे यांनी करून दिली असल्याचे ही शेवाळे यांनी करुन दिली. केंद्रात सरकार स्थापन करताना शिवसेनेने सहकार्याची भूमिका ठेवली आहे. आमचा कुठला यापूर्वी आग्रह नव्हता ही जाणीव एकनाथ शिंदे यांनी करून दाखवला असल्याकडेही राहुल शेवाळेंनी म्हटले.
