जळगावमध्ये बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, मुख्यमंत्री कोण हा शेवटी भाजप नेतृत्वाचा हा विषय आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट करत आमची काहीही अडचण होणार नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह जो निर्णय घेतील त्या निर्णयाला माझा शंभर टक्के पाठिंबा असेल असे एकनाथ शिंदे साहेबांनी आधीच सांगितलं असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
एकनाथ शिंदे नाराज आहेत? गुलाबराव पाटील म्हणतात...
एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का, यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, ते बिलकुल नाराज नाहीत. एकनाथ शिंदे साहेब हे रसायन आहे. नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही. फार खडतर प्रवास त्यांनी यापूर्वी केलेला आहे. अडीच वर्षांमध्ये लोकांनी त्यांना जे प्रेम दिलेला आहे त्यामुळे ते नाराज राहण्याचा प्रश्नच येत नाही असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
गृहमंत्री शिवसेनेला मिळणार?
गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, खाते मागणं ही कुठली चुकीची गोष्ट नाही. महायुतीमध्ये तिघेजण आहेत, त्यामुळे वाटणी करावी लागेल. पण, त्यामुळे हे खातं हवंय त्याची मागणीच करू नये असा त्याचा अर्थ होत नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार आजारी...
गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, जवळपास 50 टक्के आमदार हे आजारी आहेत. घशाचे इंफेक्शन आणि ताप हे बऱ्याचशा आमदारांना झालं आहे. मी सुद्धा सहा ते सात सलाईन मुंबईमध्ये घेतल्या आहेत. मात्र, त्यांना जरी ताप असला तरीदेखील एकनाथ शिंदे हे मुंबईतील बैठकीत हजर राहतील असेही गुलाबराव पाटलांनी सांगितले.
