विधानसभा निवडणुकीत भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत. तर, आणखी पाच अपक्ष आणि लहान घटक पक्षांच्या आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडूनही अपक्ष आमदार गळाला लावण्यास सुरुवात झाली आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे हे सावधगिरी बाळगताना दिसत आहेत.
शिंदेंनी आमदारांकडून घेतले प्रतिज्ञापत्र...
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. आमदारांच्या जोरावर त्यांनी शिवसेना हा अधिकृत पक्ष, निवडणूक चिन्ह स्वत:कडे घेतले. त्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री शिंदे हे जपून पावले टाकत आहे. ठाकरेंपाठोपाठ शिंदेंनीही आपल्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत. पक्षात पक्षातील मुख्य नेते यांचा निर्णय अंतिम राहणार असून या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असणार आहेत. पक्षातील सर्व नियम व अटी त्याचबरोबर पक्ष शिस्तीचे पालन केले जाईल असा आशय या प्रतिज्ञा पत्रात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भविष्यात उद्धव ठाकरे यांना आव्हान देताना ज्या गोष्टी घडल्या, त्या पुन्हा घडू नये यासाठी शिंदे खबरदारी घेत असल्याची चर्चा आहे.
advertisement
भाजपला 5 आमदारांचा पाठिंबा
भाजपनं राज्यात 132 जागा जिंकल्या आहेत. तसंच छोटे पक्ष, अपक्ष अशा 5 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि अशोक माने, युवा स्वाभीमानी पक्षाचे रवी राणा, अपक्ष शिवाजी पाटील यांचा समावेश आहे. या अपक्षांच्या पाठिंब्यामुळे विधानसभेत भाजपचं संख्याबळ 137 वर जावून पोहोचलं आहे आणि त्यामुळेचं भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांचं नाव पुढे केलं जात आहे.
