डॉ. अखिल श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून परतीच्या पावसाला 15 सप्टेंबरपासून सुरुवात होणार होती. त्याच दरम्यान पश्चिम बंगालचा उपसागर आणि महाराष्ट्रातील काही पट्ट्यात कमी दाबाचे क्षत्र अचानक तयार झालं आहे. तेलंगणाच्या उत्तरेकडील भाग आणि विदर्भाच्या सभोवतालच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
advertisement
यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 14 सप्टेंबरपासून पुढचे तीन दिवस अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कमी दाबाचे क्षेत्र सध्या उत्तर तेलंगणा आणि लगतच्या विदर्भ भागात आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-उत्तर पश्चिम दिशेने विदर्भाच्या मध्य भागाकडे सरकण्याची शक्यता आहे.
याशिवाय, एक चक्रवाती वाऱ्यांची स्थिती ईशान्य बांगलादेशात आणि दुसरी आसामच्या मध्य भागात दिसून आली आहे. हिंदी महासागरातही दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय आहेत, ज्यापैकी एक दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात, तर दुसरी पश्चिम-मध्य आणि वायव्य अरबी समुद्रात आहे.
महाराष्ट्रासाठी पावसाचा इशारा
या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढचे 48 तास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण-गोवा येथे अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुढील 48 तास अति मुसळधार ते मुसळधार पाऊस असे अशी माहिती हवामान विभागाने दिली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्त पाऊस राहणार आहे. ही परिस्थिती निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र दोन दिवसांपासून तयार झालं आहे. त्याची मूव्हमेंट ही पश्चिम दिशेनं आहे. त्यामुळे मान्सूनचे वारे सुद्धा सक्रिय झाले होते. त्याच बरोबर विदर्भ आणि त्याचा आसपासच्या प्रदेशात हे विरलं गेलं असलं तरीसुद्धा त्याचा परिणाम वातावरणावर झाला आहे. त्यामुळे बहुतांश भागात जोरदार पाऊस पडताना दिसत आहे.