महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) 2025 च्या बारावी (HSC) परीक्षेत एकूण 14,27, 085 नियमित विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या 36,133 विद्यार्थ्यांपैकी 35 हजार 697 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यंदाच्या बारावीच्या परीक्षेत 154 पैकी 37 विषयांचा निकाल हा 100 टक्केल लागला.
advertisement
लातूर पॅटर्न फेल, मुंबईचा निकाल किती?
राज्यात कधी काळी लातूर पॅटर्नचा मोठा बोलबाला होत असे. मात्र, मागील काही वर्षांपासून लातूर विभागाच्या निकालात घट असल्याचे चित्र आहे. यंदाच्या वर्षात अपेक्षेप्रमाणे कोकण विभागात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, दुसरीकडे लातूरमध्ये सगळ्यात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर विभागाचा निकाल हा 89.46 टक्के इतका लागला. तर, मुंबई विभागाचा निकाल हा 92.93 टक्के इतका लागला.
बारावीचा विभागनिहाय निकाल
- कोकण - 96.14
- छत्रपतीसंभाजी नगर - 92.24
- मुंबई - 92.93
- पुणे - 91.32
- कोल्हापूर - 93.64
- लातूर - 89.46
- अमरावती - 91.43
- नागपूर - 90.52
- नाशिक - 91.31
इथं पाहा झटपट निकाल...
मुलींनी मारली बाजी...
यंदाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थीनींनी बाजी मारली. तर, विद्यार्थी पिछाडीवर राहिले. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत 89.51 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, 94.58 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले.