Maharashtra HSC Result : बारावीचा निकाल जाहीर, राज्यात 91. 88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण ठरलं अव्वल!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra HSC Result 2025 :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 12 वी (बारावी) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 12 वी (बारावी) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. शिक्षण मंडळाच्यावतीने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात आला. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) 2025 च्या बारावी (HSC) परीक्षेत एकूण 15 लाखांच्या आसपास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थीनींनी बाजी मारली. तर, विद्यार्थी पिछाडीवर राहिले. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत 89.51 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, 94.58 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले.
कोकण विभागाने मारली बाजी...
advertisement
यंदादेखील महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागातील 96.74 विद्यार्थ्यांनी बाजी मारली. सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला.
विभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे:
- कोकण - 96.14
- छत्रपतीसंभाजी नगर - 92.24
- मुंबई - 92.93
- पुणे - 91.32
- कोल्हापूर - 93.64
- लातूर - 89.46
advertisement
- अमरावती - 91.43
- नागपूर - 90.52
- नाशिक - 91.31
>> बारावीचा निकाल कसा पाहायचा? (Step-by-step Process)
1. mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
2. ‘HSC Examination Result 2025’ लिंकवर क्लिक करा
3. तुमचा Roll Number आणि आईचं नाव (Mother’s Name) टाका
4. ‘View Result’ बटणावर क्लिक करा.
advertisement
>> महाराष्ट्र बोर्डासह कोणत्या वेबसाइटवर पाहता येईल निकाल?
बारावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र बोर्डासह इतरही काही वेबसाइटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. तुम्ही निकाल पाहण्यासाठी पुढील वेबसाइटचा वापर करू शकता.
> https://mahahsscboard.in
> http://hscresult.mkcl.org
> https://results.digilocker.gov.in
> https://results.targetpublications.org
> https://results.navneet.com
Location :
Pune (Poona) [Poona],Pune,Maharashtra
First Published :
May 05, 2025 11:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra HSC Result : बारावीचा निकाल जाहीर, राज्यात 91. 88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण ठरलं अव्वल!