TRENDING:

Ajit Pawar Sharad Pawar : होमग्राउंडवर काकांविरोधात अजित पवार मोठा डाव टाकणार, बारामती नगराध्यक्ष निवडणुकीचा उमेदवार ठरला?

Last Updated:

Maharashtra Local Body Election Ajit Pawar : अजित पवार हे आपले काका ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, बारामती-पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली असून स्थानिक पातळीवरील समीकरणे जुळवण्यावर सगळेच भर देत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर होणार्‍या या निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी जोर लावला आहे. बारामतीमध्येही चुरस रंगणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपले काका ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
होमग्राउंडवर काकांविरोधात अजित पवार मोठा डाव टाकणार, बारामती नगराध्यक्ष निवडणुकीचा उमेदवार ठरला?
होमग्राउंडवर काकांविरोधात अजित पवार मोठा डाव टाकणार, बारामती नगराध्यक्ष निवडणुकीचा उमेदवार ठरला?
advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामतीची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे. लोकसभा, विधानसभेनंतर आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट होत असल्याने आता अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.

अजित पवार टाकणार मोठा डाव?

बारामती नगर परिषद निवडणुकीची रंगत वाढत असताना, नगराध्यक्षपदासाठी जय पवार यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. जय पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत.

advertisement

स्थानिक स्तरावर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये याबाबत कुजबुज सुरू आहे. जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य राजकारणात उतरणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बारामती नगर परिषदेतील इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच या सर्व इच्छुकांशी व्यक्तिगत चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतरच उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. जय पवार यांच्या नावावर विचार सुरू असला तरी, अजित पवार संघटनातील वरिष्ठ कार्यकर्त्यांचे मत जाणून घेणार आहेत.

advertisement

स्थानिक पातळीवर जय पवार सक्रिय...

जय पवार हे मागील काही वर्षांपासून स्थानिक पातळीवर सक्रिय आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जय पवार हे अजित पवार यांच्यासोबत सातत्याने विविध कार्यक्रमात दिसून आले आहेत. जय पवार यांच्याआधी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे देखील लोकसभेच्या निवडणुकीत उतरले होते. पार्थ पवार यांनी 2014 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

advertisement

लोकसभा-विधानसभेत कुटुंबात लढत, आता काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डॉक्टरची कमाल, आफ्रिकेत गाजवलं मैदान, पॉवरलिफ्टिंगमध्ये केली 7 पदकांची कमाई
सर्व पहा

राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. तर, विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात पुतण्या युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात होता. त्यानंतर आता बारामती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जय पवार यांच्याविरोधात पवार कुटुंबातील सदस्यच शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की अन्य कार्यकर्त्याला संधी मिळणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Sharad Pawar : होमग्राउंडवर काकांविरोधात अजित पवार मोठा डाव टाकणार, बारामती नगराध्यक्ष निवडणुकीचा उमेदवार ठरला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल