TRENDING:

Local Body Election : रात्रभर झोप नाही, दिग्गजांची धाकधूक वाढली, मुंबई-ठाण्यासह महत्त्वाच्या महापालिकांची आरक्षण सोडत

Last Updated:

Maharashtra Local Body Election : आजच्या आरक्षण सोडतीवर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आज राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत निघणार आहे. आपला प्रभाग कायम राहावा यासाठी अनेक दिग्गजांनी देवाचा धावा केला. आजच्या आरक्षण सोडतीवर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सोलापूर अशा महत्त्वाच्या महापालिकांसाठीच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे.
रात्रभर झोप नाही, दिग्गजांची धाकधूक वाढली, मुंबई-ठाण्यासह महत्त्वाच्या महापालिकांची आरक्षण सोडत
रात्रभर झोप नाही, दिग्गजांची धाकधूक वाढली, मुंबई-ठाण्यासह महत्त्वाच्या महापालिकांची आरक्षण सोडत
advertisement

मागील काही वर्षांपासून महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या प्रभाग आरक्षण सोडतीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. या सोडतीमुळे काही निवडून आलेल्या दिग्गजांचा प्रभाग आरक्षित होऊन पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काही प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारीसाठी पक्षांतर्गत संघर्ष चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे, काही प्रभागांत माजी नगरसेवकांना एकमेकांसमोर निवडणुकीच्या रणांगणात उतरावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलू शकतात.

advertisement

आक्षण सोडतीनंतर राजकारण रंगणार...

आरक्षण सोडतीनंतरचे चित्र स्पष्ट झाल्यावर महापालिकांतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. या सोडतीनंतर काही ठिकाणी इनकमिंग-आउटगोईंग वाढण्याची शक्यता आहे. आपला वॉर्ड महिला आरक्षित झाल्यास त्या ठिकाणी पत्नीलाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी काही माजी नगरसेवकांनी केली आहे. तर, काही जणांनी पर्यायी वॉर्डची तयारी सुरू केली आहे.

advertisement

महामुंबईत ९ महापालिकांसाठी सोडत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यंदा रथसप्तमीला सुवर्णयोग! ‘त्या’ इच्छा होतील पूर्ण, का करतात सूर्यदेवाची पूजा?
सर्व पहा

मुंबईसह महामुंबईतील ९ महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत निघणार आहे. यामध्ये ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या महापालिकांचा समावेश आहे. त्याशिवाय पनवेल, मीरा-भाईंदर, वसई-विरार या महापालिकांसाठीदेखील आरक्षण सोडत निघणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Local Body Election : रात्रभर झोप नाही, दिग्गजांची धाकधूक वाढली, मुंबई-ठाण्यासह महत्त्वाच्या महापालिकांची आरक्षण सोडत
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल