नेमकं प्रकरण काय?
बुलढाण्यातली शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांतील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण झाली आहे. यामध्ये नागरिकांना फक्त तीनच दिवसात टक्कल पडतंय. त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील पहायला मिळतंय. काही दिवसात 40 ते 50 लोकांना टक्कल पडल्याची माहिती मिळत आहे. या आजारात आधी लोकांच्या डोक्याला खाज सुटते अन् मग केस गळायला लागतात.
advertisement
आरोग्य विभाग अलर्टवर
शॅम्पू वापरणाऱ्या लोकांचे टक्कल पडत असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. पण शॅम्पू कधीच वापरला नाहीय त्यांनाही अचानक केस गळती झाली, असं नागरिकांचं म्हणणं आहे. पुरुषच नाही तर महिलांनाही या आजाराचा सामना करावा लागतोय. त्यामुळे गावातील लोक यामुळे दहशतीखाली आहेत. आरोग्य विभागाची टीम गावात पोहोचली असून नमुने गोळा केले जात आहेत. तसेच आरोग्य विभागाकडून तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
दरम्यान, सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके खाजवणं, नंतर सरळ केस हाती येणं आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत अनेक नागरिक या आजाराचे बळी ठरले आहेत. अनेक तरुणांनी या आजारामुळे टेन्शन देखील आलाय. नागरिकांच्या आवाहननंतर आता राजकीय नेत्यांनी देखील या आजाराला गांभीर्याने घेतलं आहे. या आजारापासून लगेच सुटका मिळाली, अशी प्रार्थना नागरिक करत आहेत.
