महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवडयात घेण्यात येणार आहे.
advertisement
तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा कधी होणार?
तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायित अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षांचे देखील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची तोंडी परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. तर दहावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा (HSC- SSC Exam 2026 Time Table)
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा कालावधी ( HSC Exam 2026)
- मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी, 2026 ते मंगळवार, दि. 18 मार्च 2026 (माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षेसह)
- प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : शुक्रवार, दि. 23 जानेवारी 2026 ते सोमवार, 9 फेब्रुवारी 2026
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा कालावधी (SSC Exam 2026 )
- शुक्रवार, दि. 20 फेब्रुवारी, 2026 ते बुधवार दि. 18 मार्च, 2026
- प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : सोमवार, 02 फेब्रुवारी 2026 ते गुरूवार, 18 फेब्रुवारी 2026 (शरीरशास्त्र , आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसह )
सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर होणार
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसह विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2026 च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.