राज्य परिवहन महामंडळाने गेल्या काही दिवसांपूर्वीच महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. महिलांसाठी महामंडळाकडून मिळालेल्या ओळखपत्रावरूनच अर्ध तिकीट मिळणार अशी माहिती होती. तर ज्येष्ठ नागरिकांनाही ओळखपत्रावरुन तिकीट माफ होणार आहे. तर आता अशातच एसटी महामंडळाने (MSRTC) प्रवाशांसाठी एक खास आणि आकर्षक योजना सुरू केली आहे. या ‘एसटी पास योजनेमुळे’ प्रवाशांचा प्रवासा दरम्यान खर्च खूप कमी होणार आहे. योजनेनुसार, प्रवाशाला फक्त 585 इतके पैसे भरून 4 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अमर्याद प्रवास करू शकणार आहेत.
advertisement
जन्म- मृत्यूच्या नोंदी लवकर करा, अन्यथा...; सरकारचा नवा नियम काय सांगतो?
विशेषतः सुट्टीच्या दिवसांमध्ये फिरायला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. या पासमुळे महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणे कमी खर्चात पाहणे शक्य होणार आहे. पासाचा लाभ प्रवाशांना सध्या मिळत आहे. 585 रुपयाचा हा पास सर्वसामान्यांना खूप परवडणारा आहे. एकदा पास घेतल्यावर, तो पुढच्या 4 दिवसांसाठी वैध असणार आहे. त्या पासवर प्रवासी संपूर्ण राज्यात कुठेही आणि कितीही वेळा प्रवास करू शकणार आहेत. या पासवर प्रवाशांना एसटीच्या कोणत्याही साध्या (Ordinary) आणि निम-आराम (Semi-Luxury) बसमधून प्रवास करता येणार आहे.
तिकीटाची ही योजना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कमी खर्चात प्रवास करू इच्छिणाऱ्या व्यक्ती आणि धार्मिक यात्रेकरूंसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जर तुम्हालाही हा पास जर मिळवायचा असेल तर, प्रक्रियाही खूप सोप्पी आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही एसटी बस स्थानकावरील तिकीट काउंटरवर जाऊन हा पास खरेदी करू शकता. फक्त काउंटरवरील कर्मचाऱ्याला 585 रुपयांचा 4 दिवसांचा पास हवा आहे, असे सांगा. तुम्ही त्यांना पैसे रोख किंवा युपीआय (UPI) च्या माध्यमातून देऊ शकता. या योजनेमुळे एसटीच्या प्रवाशांना कमी पैशांत जास्त प्रवास करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल. पुढच्या वेळी प्रवासाचे नियोजन करताना ही योजना नक्की विचारात घ्या.
उल्हासनगरमध्ये गोवर-रुबेला लसीकरण मोहिम, ५-१५ वयोगटातील बालकांचे होणार लसीकरण